Sambhajinagar Trader Suicide Due To Moneylender Harassment Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : ४२ सेकंदाचा व्हिडिओ काढला, सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाराने उचललं टोकाचं पाऊल; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Sambhajinagar News : वैजापुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी व्यापाऱ्याने व्हिडिओ काढत व्यापारीच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत असल्याचं म्हटलं.

Alisha Khedekar

  • वैजापुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या

  • आत्महत्येपूर्वी 42 सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड

  • व्हिडिओच्या आधारे 7 जणांवर गुन्हा दाखल

  • पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Trader Suicide Due To Moneylender Harassment : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील वैजापुरात व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याची ही घटना पहिलीच नसली तरी या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान व्यापाऱ्याने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ काढला असून "ये विक्या, मुक्या बहुत परेशान कर रहे है मुझे" असं म्हटलं आहे. याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वैजापुर शहरातील शेख करीम शेख चुन्नू (४५) हे बटाटा व्यापारी होते. करिम यांनी सावकाराकडून कर्ज घेतल्याने तो सतत त्यांचा जाच करत होता. या जाचाला कंटाळून घरातच गळफास घेऊन करिम यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

आत्महत्या करण्यापूर्वी करिम यांनी मोबाइलवर व्हिडिओ रेकॉर्ड काढला. त्यावरून अन्नू आझाम शेख, वसीम बाबू बागवान, विलास शेटे, घायवट बाई, विनोद राजपूत, मुकेश राजपूत आणि विक्रम राजपूत या ७ जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यांनी पैशांच्या कारणावरून शेख करीम यांना मानसिक त्रास दिला असल्याचं समोर आलं आहे.

व्हिडिओमध्ये चित्रित झाल्याप्रमाणे, करिम यांनी म्हटले आहे की, "विक्या आणि मुक्या मला खूप त्रास देत आहेत. मी माझ्या कुटुंबियांवर खूप प्रेम करतो. परंतु मी खूप वैतागलो आहे. मी आत्महत्या करत आहे." असा ४२ सेकंदांचा व्हिडिओ शेख करीम यांनी गळफास घेण्यापूर्वी काढला. या व्हिडिओवरून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney cancer: ही ७ लक्षणं दिसली तर समजा किडनीचा कॅन्सर शरीरात करतोय घर; लगेच करून घ्या तपासणी

Namo Shetkari Yojana: ९४ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १० दिवसात खात्यात जमा होणार ₹४०००

Silver Rate: बापरे! चांदीने ओलांडला ३ लाखांचा टप्पा! आज १ किलो चांदीसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

US Vs Iran: अमेरिका 48 तासात इराणवर करणार हल्ला? चीनची इराणला लष्करी मदत?

Maharashtra Live News Update: कल्याण–डोंबिवलीतील 53 नगरसेवक कोकण भवनच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT