Viral Video : अंगाला स्पर्श केल्याचा इन्फ्लुएन्सरचा आरोप, व्हिडिओ व्हायरल झाल्याने तरुण नैराश्यात, घाबरून आयुष्य संपवलं

Kerala Influencer Viral Video Ends Youth Life : केरळमध्ये इन्फ्लुएन्सरने व्हायरल केलेल्या व्हिडिओनंतर एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील आरोपांचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत.
Viral Video : अंगाला स्पर्श केल्याचा इन्फ्लुएन्सरचा आरोप, व्हिडिओ व्हायरल झाल्याने तरुण नैराश्यात,  घाबरून आयुष्य संपवलं
Kerala Influencer Viral Video Ends Youth LifeSaam Tv
Published On
Summary
  • व्हायरल व्हिडिओनंतर तरुणाची आत्महत्या

  • सोशल मीडियावरील आरोपांचे गंभीर परिणाम

  • कुटुंबीयांनी आरोप फेटाळले

  • पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू

प्रगत तंत्रज्ञानामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीची पोलखोल सहज करता येते. तसेच ते प्रकरण सहजरित्या सोशल मीडियावर मांडता येते, ज्यामुळे चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवता येतो. याचाच फायदा घेत काहीजण सोशल मीडियावर फक्त लाईक कमेंटसाठी तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी गैरवापर करतात. मात्र त्याचा एखाद्याच्या आयुष्यावर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो याची कल्पनाही नसते. अशीच एक घटना केरळ मधून समोर आली आहे. एका इन्फ्लुएन्सर तरुणीने व्हायरल केलेल्या व्हिडिओनंतर तरुणाने आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव दीपक असे आहे. तो मूळचा कोझिकोडचा रहिवासी होता आणि एका कापड कंपनीत काम करत होता. १६ जानेवारी रोजी तो कामानिमित्त कन्नूरला जात होता. कन्नूरला जाण्यासाठी तो बसमध्ये चढला. या बसमध्ये असलेल्या एका तरुणीला त्याचा चुकीचा स्पर्श झाल्याचा तरुणीने आरोप केला. या संदर्भात तरुणीने व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट देखील केली.

Viral Video : अंगाला स्पर्श केल्याचा इन्फ्लुएन्सरचा आरोप, व्हिडिओ व्हायरल झाल्याने तरुण नैराश्यात,  घाबरून आयुष्य संपवलं
Crime News : घराच्या छपरावर चढला, आईवर बंदुकीने निशाणा धरला; पोटच्या मुलाने केली जन्मदात्रीची गोळी झाडून हत्या

या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर दीपक अधिक तणावात गेला. दोन दिवस त्याने काही खाल्लेही नाही. रविवारी सकाळी ७ वाजता आई-वडील त्याला उठवण्यासाठी गेले पण दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून खोलीत गेले असता दीपक गळफास घेतलेल्या मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले असून व्हायरल व्हिडीओच्या दृष्टीकोनातूनही तपास केला जाणार आहे.

Viral Video : अंगाला स्पर्श केल्याचा इन्फ्लुएन्सरचा आरोप, व्हिडिओ व्हायरल झाल्याने तरुण नैराश्यात,  घाबरून आयुष्य संपवलं
Nagpur : नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, शहरातील वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

दीपकच्या कुटुंबियांनी महिला इन्फ्लुएन्सरने केलेले आरोप फेटाळून लावलेत. त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं की, आमचा मुलगा निर्दोष होता. तो असं कधीच करू शकत नाही. व्हिडीओ व्हायरल होताच अपमान झाल्याच्या भावनेनं तो नैराश्येत होता. दीपकच्या आत्महत्येनंतर तरुणीने पुन्हा एकदा व्हिडिओ करत आपली बाजू मांडली आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, मला वाटलं नव्हतं तो आत्महत्या करेल. शिवाय ती तिच्या आरोपांवर ठाम असल्याचंही तिने म्हटलं. मात्र तिने दिपकचा पूर्वीचा व्हिडिओ डिलीट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com