Nagpur : नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, शहरातील वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

Nagpur Traffic Update News : भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सामन्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. वर्धा मार्गावर जड वाहनांना बंदी असून नागरिकांना मेट्रो वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Nagpur : नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी,  शहरातील वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा
India vs New Zealand T20 Cricket Match Traffic Update Nagpur Saam Tv
Published On
Summary
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सामना २१ जानेवारी रोजी नागपूरमध्ये होणार

  • सामन्यादरम्यान वर्धा मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी

  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित

  • क्रिकेट रसिकांनी मेट्रोचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

India vs New Zealand T20 Cricket Match Traffic Update Nagpur नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० सामन्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात येणार आहे. या सामन्याच्या दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

नागपूरमध्ये उद्या म्हणजेच २१ जानेवारी २०२६ रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० सामना रंगणार आहे. सामन्याच्या दरम्यान वर्धा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्धा मरगावर जड वाहनाना प्रवेशबंदी असणार आहे. तसेच पोलिसांकडून पार्किंगसाठी मैदानाकडे जागा निश्चित करण्यात आली आहे.

Nagpur : नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी,  शहरातील वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा
Exit Poll : उल्हासनगरमध्ये शिंदेंचं वर्चस्व, पण सत्तेसाठी भाजपला सोबत घ्यावं लागणार?

वाहन येण्यासाठी आणि बाहेर पाडण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. सोबतच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी क्रिकेट रसिकांनी शक्यतोवर मेट्रोचा वापर करावा असे वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. शिवाय अनुचित प्रकार टाळण्यासाठी एआयच्या माध्यमातून पार्किंगमध्ये किती जागा शिल्लक आहे? स्टेडियममध्ये कोणी क्रिमिनल आला का? किंवा कोणाकडे शस्त्र किंवा स्टेडियम मध्ये कोणी गदारोळ करतोय का? यावर बारकाईने लक्ष असणार आहे. नागरिकांनी या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Nagpur : नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी,  शहरातील वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा
Central Railway : मुंबई ते सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालविण्याची कोकणवासियांची मागणी, कारण काय? वाचा

खालील प्रमाणे वाहतुकीत बदल केले जाणार :-

  • नागपूर ते वर्धाकडे जाणारी जड वाहतुक ही मुंडले शाळा कटींग येथुन डावे वळण घेवुन सरळ समृध्दी मार्गे, तसेच जबलपूर कडुन वर्धाकडे जाणारी जड वाहतुक ही पांजरा टोल नाका कडुन, सरळ समृध्दी मार्गे झीरो सर्कल पॉईट तेथुन डावे वळण घेवुन दाताळा मार्गे बुट्टीबोरी कडे जाईल.

  • चंद्रपुर, हैद्राबाद, वर्धा कडुन नागपूर कडे येणारी जड वाहतुक ही बुट्टीबोरी कडुन दाताळा मार्गे समृध्दी झीरो सर्कल मार्गे उजवे वळण घेवुन, माउली कटींग येथुन डावे वळण घेवुन वर्धा- नागपूर राष्ट्रीय माहामार्ग एन.एच-४४ ने नागपूर कडे जाईल.

  • हिंगणा अमरावती मार्गे हैद्राबाद चंद्रपुर वर्धाकडे जाणारी जड वाहतुक, ही समृध्दी झीरो सर्कल येथुन उजवे वळण घेवुन दाताळा मार्गे बुट्टीबोरी कडे जाईल.

  • हैद्राबाद -वर्धाकडुन जबलपुरकडे जाणारी जड वाहतूक ही, बुट्टीबोरी कडुन दाताळा मार्गे समृध्दी झीरो सर्कल येथुन उजवे वळण घेवुन एन. सी.आय, पांजरा टोल मार्गे जबलपुरकडे जातील. तसेच छत्रपती चौक ते डोंगरगाव टोल नाका पर्यंत सर्व जड वाहतूकीकरीता बंद करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com