ZP School Saam Tv
महाराष्ट्र

इंग्रजी शाळांना बाय-बाय, तब्बल ४५०७ विद्यार्थी मराठी शाळेत दाखल

जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे.

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा: काही वर्षापासून राज्यातील झेडपीच्या (ZP) शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती. पालकांनी इंग्रजी शाळांना पसंती दिली होती. पण आता पुन्हा झेडपीच्या शाळांना चांगले दिवस आले आहेत. आता झेडपीच्या शाळेत अध्ययन-अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड देवून नाविन्यपूर्णता उपक्रमशीलतेतून वाढलेली लोकप्रियता आणि नव्या दमाच्या शिक्षकांना जुन्याजाणत्या शिक्षकांनी पाठबळ दिले आहे. त्यामुळे गुणवत्ता वाढली आहे. या कारणांमुळे गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना (School) पालक व विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांनी "शाळा बंद शिक्षण सुरू" या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये म्हणून, तर  २०२१- २२ या वर्षात खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बाय-बाय करीत जिल्हा परिषद शाळेत तब्बल ४५०७ विद्यार्थ्यांनी (Student) प्रवेश घेतला आहे.

हे देखील पहा

शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून दिल्या

कोरोना (Corona) काळातही विविध माध्यमांचा वापर करत वाड्या-वस्त्या खेड्यापाड्यातील दुर्गम भागात शिक्षकांनी पोहोचून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. यात प्रामुख्याने विद्यार्थी शिक्षक मित्र प्रत्यक्ष गृहभेटी गावातील मोकळ्या जागेत ज्ञानदान मोबाईल इंटरनेट, तसेच जाणकार पालकांच्या मदतीने अभ्यास घेतला. काही तंत्रस्नेही शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून दिल्या पालकांचाही कल या शाळांकडे वाढला असल्याचे चित्र आहे, असं अजय भोयर म्हणाले.

कोरोना (Corona) काळात जिथे इंग्रजी माध्यमांच्या शाळा पालकांकडून ऑनलाईन शिक्षणाच्या जबरदस्तीने शुल्क वसूल करीत होते. तिथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष काम करत होते. ऑनलाइन, ऑफलाइन यासह विविध माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले.

गेल्या वर्षभरात हिंगणघाट आणि वर्धा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना (Marathi School) विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २१२२ शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. हिंगणघाट तालुक्यात १४९६ विद्यार्थी वाढले असून, वर्धा तालुक्यात ७४९ विद्यार्थी वाढले आहेत. तर आर्वी तालुक्यात कमी म्हणजेच २७२ विद्यार्थी वाढल्याची माहिती मिळाली आहे.

पटसंख्या  पटसंख्या   वाढलेली

२०२०-२१  २०२१-२२   

४५०३३ ४९५४०  ४५०७

तालुका    पटसंख्या      पटसंख्या

आर्वी        ६०२७            ६२९९ 

आष्टी        ३५१२            ३८०३ 

देवळी      ५११६           ५४२५

 हिंगणघाट ६६०९            ८१०५     

कारंजा    ४७१५             ५०३०     

 समुद्रपूर    ६३०५              ६९१५    

 सेलू          ८०३३              ८७८२  

वर्धा          ८०३३              ८७८२

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT