Food Poisoned To Trainee Police Personnel Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur Food Poison: प्रशिक्षणार्थी ४१ पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा, ९ जण गंभीर

Food Poisoned To Trainee Police Personnel: प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. विषबाधा कशातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान महाशिवरात्री निमित्ताने अनेकांनी उपवास पकडला होता. त्यात आज चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी, असे सांगण्यात येत आहे.

Bharat Jadhav

Food Poisoned To Trainee police personnel Chandrapur :

चंद्रपुरात सुमारे ४१ प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनंतर पोलिसांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान उपचारानंतर काही पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ९ पोलीस कर्मचाऱ्यांची तब्येत गंभीर असून त्यांच्या अजून उपचार सुरू आहेत. (Latest News)

विषबाधा कशातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान महाशिवरात्री निमित्ताने अनेकांनी उपवास पकडला होता. त्यात आज चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी, असे सांगण्यात येत आहे. आज सकाळ पाळीत सुमारे ४० प्रशिक्षणार्थ्यांनी कॅन्टिनमध्ये जेवण केले. यानंतर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातील ९ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गंभीर दखल घेत तातडीने जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जेवणाचे नमुने घेण्यात आलेत. चंद्रपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. डी-हायड्रेशनमुळे हा प्रकार घडले असावे असा डॉक्टरांनी अंदाज वर्तवलाय.

भगर खाल्ल्याने १२५ जणांना विषबाधा

महाशिवरात्रीनिमित्ताने अनेक ठिकाणी भाविकांना भगर आणि साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले होते त्यातून भाविकांना विषबाधा झाली होती. उपवासाची भगर खाल्ल्याने जवळपास १२५ जणांना विषबाधा झाली होती. नंदुरबार जिल्ह्यातील घोटाणे तसेच वडाळी या गावात घडली होती. वातावरणातील बदल आणि खराब दर्जाची भगर खाल्ल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील सुमारे ७५ जणांना विषबाधा झाली होती.

भगर आणि शिंगाड्याचे पीठ खाल्ल्यामुळे नागरिकांना विषबाधा

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे ५० हून अधिक लोकांना विषबाधा झाली होती. महाशिवरात्रीनिमित्त अनेकजणांनी भगर आणि शिंगाड्याच्या पिठाची शेव आणि भजी खाल्ली होती. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला होता. महाशिवरात्रीला उपवासाचे थालीपीठ खाल्याने २० ते २५ जणांना विषबाधा झाल्याची घटना यापूर्वी नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरात घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT