Nagpur News: धक्कादायक! उपवासाचे थालीपीठ खाल्याने २० ते २५ जणांना विषबाधा; नागपुरातील घटना

Nagpur Latest News: महाशिवरात्रीला (Mahashivratri 2024) उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरात घडली.
Nagpur Food Poisoning:
Nagpur Food Poisoning: Saamtv
Published On

पराग ढोबळे, नागपूर|ता. ९ मार्च २०२४

Nagpur Food Poisoning:

राज्यभरात महाशिवरात्रीच्या उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. नागपूरमधूनही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरच्या त्रिमुर्तीनगरमध्ये महाशिवरात्रीला उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाशिवरात्रीला (Mahashivratri 2024) उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरात घडली. दोन दिवसांपूर्वी 20 दुकानांतून खाण्याचा उपवास भाजणी आटा देण्यात आला होता. एका खासगी कंपनीचे (श्री जी) भाजणी पीठ खाल्याने अनेकांना उलटी, मळमळ आणि चक्करचा त्रास होऊ लागला.

या त्रासानंतर रुग्णांना विविध खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शहरातील व्होकार्ड, पडोळे, अवंतीका, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे रुग्ण भरती असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फूड निर्माती कंपनीवर कारवाईला सुरवात केली आहे.

Nagpur Food Poisoning:
Nitesh Rane : प्रकाश आंबेडकर सावध व्हा ! ज्या जागा तुम्ही जिंकू शकत नाही, मविआ तुम्हांला देत आहे : नितेश राणे

अन्न व औषध विभागाने या घटनेची दखल घेतली असून कंपनीच्या मनुफॅक्चरिंग युनिट मधील खाद्य पदार्थांच्या कच्या मालाचे नमुने तपासण्यात येत आहेत. यासाठी २० दुकानातील सॅम्पल परत मागवले आहेत. हे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur Food Poisoning:
Raj Thackeray Speech Points: राज ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे; मनसैनिकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com