Divorce Due To Mobile Saam Tv
महाराष्ट्र

Divorce News : मोबाईल ठरतोय सुखी संसारात अडथळा? अमरावतीत वर्षभरात ४०० घटस्फोट

Divorces In Amravati: मोबाईल हे मनोरंजनांचं साधन आहे. पण हाच मोबाईल आता पती पत्नीच्या सुखी संसारात अडथळा निर्माण करताना दिसत आहे. मागील वर्षात अमरावतीत ४०० घटस्फोट झाल्याचं समोर आलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Divorces Due To Mobile

एकमेकांशी संपर्क साधण्याचं, एकमेकांच्या जवळ जाण्याचं साधन म्हणून मोबाईलकडे पाहिलं जातं. दिवसेंदिवस मोबाईलची आपल्या खासगी आयुष्यातील लुडबुड वाढत आहे, तसा त्याचा दुष्परिणाम देखील पाहायला मिळतोय. या मोबाईलमुळं अलीकडं नाती दुरावताना दिसत आहेत. मोबाईल वापरामुळं अमरावती जिल्ह्यात मागील वर्षी ४०० घटस्फोट झाल्याची माहिती मिळतेय. (latest marathi news)

मोबाईल आणि सोशल मीडियामुळं नात्यांमध्ये तेढ निर्माण होतेय. पती पत्नीच्या सुखी संसारावरही याचा परिणाम पाहायला मिळतोय. कौटुंबिक, वैयक्तिक कारणांमुळं अनेक जोडप्यांमध्ये वाद होतात. हे प्रकरणं अनेकदा घटस्फोटापर्यंत पोहोचतात. २०२३ मध्ये शहर आणि तालुका कार्यक्षेत्र अमरावतीचे कुटुंब कोर्टात सुमारे ४०० घटस्फोट झाले आहेत.

परस्पर संमतीने घटस्फोट

२०२३ मध्ये लग्न, घटस्फोटाशाची संबंधित एकूण ५८३ प्रकरणे हाताळली गेली होती. यामध्ये सुमारे ४०० प्रकरणं घटस्फोटाची आहेत. पोटगीशी संबंधित १७१ प्रकरणं निकाली काढण्यात आली. तर परस्पर संमतीनं गेल्या वर्षी सुमारे ४०० प्रकरणांचा घटस्फोट मंजूर झालाय. १०० पेक्षा जास्त अर्ज निकाली काढण्यात आलेत. परस्पर संमतीने या जोडप्यांनी घटस्फोट घेतला. त्यांनी घटस्फोट घेण्यासाठी सहमती दर्शविली (amravati) होती.

लग्नानंतर एका वर्षानंतर लगेच घटस्फोट घेता येतो. घटस्फोट (divorce) घेण्यासाठी परस्पर संमतीनं अर्ज करता येतो.

घटस्फोटाचं नेमकं कारण काय?

माध्यमांच्या अतिवापरामुळं अनेक घटस्फोट झाल्याचं समोर येतंय. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर सतत सर्फिंग केल्यामुळे पती-पत्नी त्यांच्यात बाचाबाची झालीय. रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर चॅट करण्यामुळं अनेक जोडप्यांमध्ये गैरसमज झाल्याचं, एकमेकांवर संशय घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळं त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय.

अलीकडे मोबाईलला असलेल्या पासवर्डमुळं अनेकदा पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचं पाहायला मिळतंय. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात. पण हल्ली मनुष्यानेच तयार केलेलं एक साधन म्हणजेच मोबाईल या गाठी तोडण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचा दिसतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT