Panvel Cemetery: मोबाईल टॉर्चवर केला अंत्यविधी; प्रशासनाला जाग केव्हा येणार?

Funeral on mobile torch: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळामधील कल्हे गावातून ही संतापजनक बातमी समोर आलीये. स्मशानभूमीत पुरेसा उजेड नाहीये.
Panvel Cemetery
Panvel CemeterySaam TV
Published On

सिद्धेश म्हात्रे

Panvel News:

एकीकडे विकासकामांचा झगमगाट तर दुसरीकडे मूलभूत सुविधांची वाणवण अशी काहीशी परिस्थिती पनवेल तालुक्यात पहायला मिळतेय. पनवेलमधील एका गावातील स्मशानभूमीत रात्रीच्यावेळी लाईटीची सोय नाहीये. त्यामुळे नागरिकांना मोबाईल टॉर्चमध्ये अंत्यविधी करावा लागतोय.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Panvel Cemetery
Chandrapur Crime News: पेट्रोल पंप लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या तेलंगणा सीमेवर आवळल्या मुसक्या, बारा तासांत दरोड्याचा छडा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळामधील कल्हे गावातून ही संतापजनक बातमी समोर आलीये. स्मशानभूमीत पुरेसा उजेड नाहीये. त्यामुळे चक्क मोबाईलच्या टॉर्चवर अंत्यविधी करण्याची नामुष्की ग्रामस्थांवर आली आहे.

कल्हे गावातील रहिवासी मोहिनी चव्हाण यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले मात्र रात्रीची वेळ असल्याने पुरेसा उजेड देखील स्मशानभूमीत नव्हता. अखेर ग्रामस्थांनी मोबाईलच्या टॉर्च लावल्या आणि अंत्यविधीची क्रिया पार पाडली.

प्रशासनाचे दुर्लक्ष आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांना मूलभूत सुविधेपासून देखील वंचित रहावे लागत आहे. या घटनांची पुनरावृत्ती होऊनये याची दखल प्रशासनाने घेण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. तसेच सदर स्मशानभूमीत तात्काळ विजेची सोय करावी अशी मागणी देखील करण्यात आलीये.

बीड जिल्ह्यातील काही गावांत देखीव स्मशानभूमीची समस्या आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी स्मशानभूमी अभावी प्रेत शासनाच्या दारी आंदोलन केलं होतं.

जिल्ह्यातील 1394 पैकी 656 गावात स्मशानभूमीची सोय नसल्याने मृतदेहांची हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आला होता. पावसाळ्यात या घटना सर्वाधिक समोर येतात. त्यात वादविवाद होऊन मृतदेहाचे हेळसांड होते. त्यामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमीची दुरावस्था दूर करून स्मशानभूमी बांधल्या जाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.

Panvel Cemetery
Ahmednagar Crime: शंकर बाबा सावली मठात चोरी; दानपेटी घेऊन चोरटा पसार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com