Satara Saam TV
महाराष्ट्र

साताऱ्यातील संतापजनक घटना : ४ वर्षाच्या मुलीवर नराधमाकडून अत्याचार

4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर सातारा शहरासह संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.

ओंकार कदम

सातारा : सातारा (Satara) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून फिरस्त कुटुंबातील 4 वर्षीय मुलीचे पहाटेच्या सुमारास अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संकेत गुजर वय 26 राहणार तामजाई नगर असे संशयित आरोपीचे नाव असून याआधी त्याच्यावर सातारा तालुका हद्दीत चोरी आणि जबरी चोरीचे वेगवेगळे 17 गुन्हे दाखल आहेत.

4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर सातारा शहरासह संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व CCTV कॅमेरे तपासले असता मात्र तरीही आरोपी न सापडल्याने आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसानी सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल केले होते.

हे व्हायरल फुटेज आरोपीच्या वडिलांनी आणि भावाने हे ओळखून शहर पोलिसांशी संपर्क साधत संबंधित युवक हा माझा मुलगा असल्याचे पोलिसांना सांगितले. या दरम्यान बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरोपीने आधीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात शाहूपुरी पोलिसांत (Shahupuri Police) स्वतःहून हजर झाला होता त्याला न्यायालयीन कोठडी ही मिळाली होती. त्यावरून सातारा तालुका पोलिसानी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीस अटक करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. या अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT