4-month-old Kalyan Thakurli baby still missing after 24 hours Finally NDRF stopped the search operation Saam TV
महाराष्ट्र

Kalyan Thakurli Baby News: २४ तास उलटले, पण ४ महिन्यांचं बाळ सापडेना; अखेर NDRF ने सर्च ऑपरेशन थांबवलं, आता पुढे काय?

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Kalyan Thakurli Baby News Today: कल्याणच्या ठाकुर्लीजवळ बुधवारी (ता. १९) एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असतानाच काही प्रवाशी लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते. तेव्हा एका महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातातून ४ महिन्यांचं बाळ नाल्यात पडलं. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बाळ वाहून गेलं.

या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला आहे. दरम्यान, बुधवारपासून एनडीआरएफचे पथक या बाळाचा शोध घेत आहे. या घटनेला २४ तास उलटून गेले तरी सुद्धा बाळ सापडलेलं नाही. अखेर एनडीआरएफच्या पथकाने आपले प्रयत्न थांबवले आहेत.

अजूनही कल्याण अग्निशमन विभागाच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरूच आहे. कल्याण ते मुंब्रा खाडीपर्यंत हे सर्च ऑपरेशन सुरू असून बचाव पथकाचे जवान बाळाला शोधण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. आम्ही या बाळाला लवकरच शोधून काढू, असं बचावपथकाच्या जवानांनी सांगितलं आहे.

घटना नेमकी काय?

बुधवारी मुंबईसह उपनगरात धुवाधार पाऊस झाला. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून रेल्वेट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल वाहतूकीचा खोळंबा झाला. अशातच अंबरनाथहून कल्याणकडे जाणारी लोकल ठाकुर्ली स्थानकाजवळ दोन तासांपासून उभी होती.

अंबरनाथ लोकल उभा राहिली असताना काही प्रवाशी लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते. यावेळी एक महिला आणि तिचे वडिल ४ महिन्यांच्या बाळाला घेऊन नाल्याच्या कडेहून जात होते. यावेळी आजोबांचा तोल सुटला आणि त्यांच्या हातातून बाळ वाहत्या नाल्यात पडलं.

नाल्याला आलेल्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बाळ वाहून गेले. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. घटनेची माहिती मिळताच तासाभरात कल्याण व डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक कोळी बांधव, शिवसेना आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या सहाय्याने बाळाचा शोध सुरु करण्यात आला.

एनडीआरएफच्या पथकाने सुद्धा तातडीने शोधमोहिम राबवून बाळाचा शोध सुरू केला. पण पाणी जास्त असल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत बाळाचा कुठेही शोध लागला नाही. अंधार पडल्याने सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. गुरूवारी सकाळपासूनच केडीएमसीचे अग्निशमन विभागातील जवान आणि एनडीआरएफने बाळाचा शोध सुरू केला.

मात्र, २४ तास उलटून सुद्धा बाळाचा शोध अद्यापही लागला नाही. हे बाळ लवकर मिळावं अशी प्रार्थना परिसरातील नागरिक करीत आहेत. दरम्यान, एनडीआरएफच्या पथकाने सर्च ऑपरेशन थांबवलं असल्याची माहिती आहे. अजूनही केडीएमसी अग्निशमन दलाचे जवान या बाळाचा शोध घेत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हयचंय? फॉलो करा 'हा' गुरु मंत्र

SCROLL FOR NEXT