छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईमुळे एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चिकलठाणा येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. तरुणाच्या आत्महत्येनंतर स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. स्थानिकांनी जालना महामार्गावर ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरु केलं.
रामेश्वर साईनाथ नवपुते असे चिकलठाणात राहणारे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या आत्महत्येनंतर छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा मिनी घाटीसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. जोपर्यंत महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा नागरिकांनी घेतला. नागरिकांनी हा मृतदेह जालना महामार्गावर ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
राजेश्वर नवपुते याच्या मृत्यूने त्याचं चार महिन्याचं बाळ पोरकं झालं आहे. मनपा अतिक्रमण कारवाईत घर पाडले जाणार असल्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. नागरिकांनी रस्त्यावर प्रेत ठेवून रस्ता रोको सुरू केला. नागरिक आणि नातेवाईकांच्या आरोपामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
परभणीच्या जिंतूर तालुक्यात २२ वर्षीय कुमार आघावी या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ओबीसी आरक्षण गमावल्याने मानसिक तणावात आत्महत्या केल्याचं शेवटच्या चिठ्ठीत म्हटलं. आमचं मोठं नुकसान झाल्याचंही त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. परभणीतील आघावी कुटुंबाने एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.