Koyna Dam, Satara, Rain
Koyna Dam, Satara, Rain saam tv
महाराष्ट्र

Satara : सातारा जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा; उद्या काेयनेचे दरवाजे चार फुटांनी उचलणार

Siddharth Latkar

Koyna Dam : सातारा (satara) जिल्ह्यात विशेषत: काेयना भागात पावसाचा जाेर आहे. या भागात पडत असलेल्या पावसामुळे तसेच हवामान खात्यानं तीन दिवसामध्ये अति वृष्टीचा इशारा दिल्याने काेयना धरण व्यवस्थापनाने उद्या (रविवार) काेयनेतून तीस हजार शंभर क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे नियाेजन केले आहे.

काेयना धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनूसार आज (शनिवार) सायंकाळी पाच वाजता काेयना धरणाची पाणी पातळी (2153 फूट 8 इंच) वाढली आहे. तसेच धरणांत (92.59 टीएमसी) म्हणजेच (87.97 टक्के) पाणीसाठा वाढला आहे.

गेल्या 24 तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये (3.62 टीएमसी) इतकी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत धरणाच्या वक्र दरवाजातून (9596 क्यूसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून (2100 क्युसेक) एकूण (11696 क्यूसेक) विसर्ग सुरु आहे.

हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात तीन दिवसामध्ये अति पर्जन्यमान होणेची पूर्व सुचना दिली आहे. त्यामुळे उद्या (रविवार) सकाळी दहा वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे चार फुट सहा इंचाने उघडले जाणार आहेत. यावेळी अठ्ठावीस हजार क्युसेक पाण्यााच विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण तीस हजार शंभर इतका क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे. तरी कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्क राहावे असं आवाहन धरण व्यवस्थापनाने केलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'; मुंबई स्पर्धेतून बाहेर

SCROLL FOR NEXT