Badlapur saam tv
महाराष्ट्र

Badlapur: ७ वर्षांपासून धुळखात, ३० घंटागाड्या बदलापूर पालिकेनं काढल्या विक्रीस, किती पैसे मिळणार?

Old Garbage Trucks: बदलापूर नगरपालिकेने सात वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या ३० घंटागाड्या अखेर भंगारात विक्रीसाठी ठेवत, त्यांच्यावरचा खर्च व अपव्यय थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Dhanshri Shintre

बदलापूर नगरपालिकेने गेल्या सात वर्षांपासून निष्क्रिय आणि वापराविना पडून असलेल्या ३० घंटागाड्यांना अखेर भंगारात विक्रीसाठी काढले आहे. विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून खरेदी केलेल्या या घंटागाड्यांसाठी अवघ्या १६ लाख रुपयांची निविदा पालिकेने जाहीर केली आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

साल २०१७ दरम्यान बदलापूर नगरपालिकेने शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक घंटागाड्यांची खरेदी केली होती. मात्र, या वाहनांचा वापर फारकत एक वर्षच झाला. त्यानंतर काही कारणास्तव या गाड्यांना अडगळीत टाकण्यात आले. गेली सात वर्षं या गाड्या मलनिसारण प्रकल्पात उघड्यावर धूळ खात पडून होत्या. त्यांच्या देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आलं.

परिणामी, या वाहनांची स्थिती इतकी खराब झाली की, परिवहन विभागाने देखील त्या वापरण्यायोग्य नसल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला. त्यानंतर पालिकेने या गाड्या भंगारात विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी अवघ्या १६ लाख रुपयांमध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. वास्तविक पाहता, त्या गाड्यांच्या खरेदीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता.

या प्रकरणामुळे पालिका प्रशासनातील निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सार्वजनिक पैशांचा असा अपव्यय झाल्याची टीका होत आहे. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून याबाबत संताप व्यक्त केला असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

SCROLL FOR NEXT