Buldhana Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: बुलडाण्यात प्रवासी बस पुलावरुन नदीत कोसळली, महिला प्रवाशाचा मृत्यू तर 17 जण जखमी

Latest News: या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिस (Buldhana Police) करत आहेत.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

Buldhana News: बुलडाण्यामध्ये प्रवासी बसला भीषण अपघात (Buldhana Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. पैनगंगा नदी पुलावरुन बस खाली कोसळून हा अपघात झाला आहे. ही बस पुण्याला (Pune) निघाली होती. या अपघातामध्ये बसमधील एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर 17 जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिस (Buldhana Police) करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याच्या शेगाववरुन पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या प्रवासी बसला मंगळवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास अपघात झाला. स्वरा ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला हा अपघात झाला आहे. चिखली रोडवरील पेठजवळ ही घटना घडली. पेठ या गावाजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून बस खाली कोसळली.

ही लक्झरी बस जवळपास 25 ते 30 फूट खोल कोसळली. अपघातामध्ये बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. जवळपास 25 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. या अपघातामध्ये एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पेठ येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

ग्रामस्थांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व जखमींना बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधील तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, या अपघातानंतर बुलडाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

Nepal Protest: नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या शृंगार वाडीत सभेचे आयोजन सभेची जोरदार तयारी

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT