Beed News: परळीत घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, ४ जण गंभीर

Beed News: बीड शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. बीडच्या परळी शहरात एका घरात अचानक गॅसच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.
Beed news terrible explosion of a gas cylinder in Parli 14-year-old boy died 4 people were seriously injured
Beed news terrible explosion of a gas cylinder in Parli 14-year-old boy died 4 people were seriously injuredSaam TV

Beed News: बीड शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. बीडच्या परळी शहरात एका घरात अचानक गॅसच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील बरकत नगर भागात घडली. (Breaking Marathi News)

Beed news terrible explosion of a gas cylinder in Parli 14-year-old boy died 4 people were seriously injured
Dombivali Crime News: संतापजनक! आई कामानिमित्त बाहेर गेली, नराधमाने भावासमोरच बहिणीला खोलीत खेचलं अन्...

अदिल उस्मान शेख (वय १४) असं स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर परळी शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Live Marathi News)

प्राथमिक माहितीवरून घटनास्थळ (Beed News) असणाऱ्या घराच्या बाजूला आग लागली होती. आग एका बंद असलेल्या रूममध्ये जाऊन तेथील गॅसचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की बाजूला असलेल्या अदिल शेख याच्या पोटाला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

Beed news terrible explosion of a gas cylinder in Parli 14-year-old boy died 4 people were seriously injured
Beed Accident News: आनंदाने लग्नासाठी निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

तर शमशाद बी सय्यद हाकीम,शेख आवेस गौस व अन्य दोन जण जख्मी झाले. दरम्यान घटनेची माहिती कळताच परळी पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com