Vaidyanath Factory Election Announced: पुन्हा मुंडे बहीण भावाची होणार लढत; वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर,11 जूनला मतदान

Beed Political News: आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात...तर 11 जूनला मतदान आणि 12 जूनला लागणार निकाल...
Pankaja Munde and Dhananjay Munde
Pankaja Munde and Dhananjay Munde Saam TV

Beed Election News: दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या, परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून यामध्ये पुन्हा एकदा मुंडे बहीण- भावामध्ये लढत होणार आहे. आज 10 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. तर 11 जून रोजी मतदान होईल आणि 12 जूनला कारखान्यावर कोणाची सत्ता येणार? याचा निकाल हाती येईल. (Latest Marathi News)

Pankaja Munde and Dhananjay Munde
Bride Entry on Bullet: नवरदेवाला बुलेटवर घेऊन नवरीची लग्नमंडपात एट्री! वऱ्हाडी मंडळी पाहतच राहिले

वैद्यनाथ कारखान्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे वर्चस्व आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे नेते भाऊ धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे देखील कारखाना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने दोघा बहीण भावात संघर्ष पाहायला मिळणार आहे

तर कारखान्याची ही निवडणूक 21 संचालक पदासाठी होणार आहे.10 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 16 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.17 मे रोजी छाननी होईल तर 18 मे ते 1 जूनपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. 2 जून रोजी चिन्ह वाटप होईल, तर 11 जून रोजी मतदान आणि 12 जून रोजी मतमोजणी होणार आहे. (Beed News)

Pankaja Munde and Dhananjay Munde
Dombivali Crime News: संतापजनक! आई कामानिमित्त बाहेर गेली, नराधमाने भावासमोरच बहिणीला खोलीत खेचलं अन्...

दरम्यान या निवडणुकीमध्ये दोघे मुंडे भाऊ वेगवेगळे पॅनल उभे करण्याची शक्यता असून यामुळे पुन्हा एकदा मुंडे बहीण भावाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता वैद्यनाथ कारखान्यावर नेमकं कोणाची सत्ता येणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com