nagpur express /File Photos Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: धक्कादायक! तरुणाचा विनातिकीट प्रवास, टीसीने नियम सांगताच धावत्या रेल्वेतून मारली उडी

Nagpur News: रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला टीसीने कारवाईचा धाक दाखवल्याने धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे

Nagpur News:

नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला टीसीने कारवाईचा धाक दाखवल्याने धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. मोहित सोनी असं तरुणाने रेल्वेतून उडी मारल्याने जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

टीसीने विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला तुरुंगात जाण्यासंदर्भात कारवाईचा धाक दाखवला. त्यानंतर या तरुणाने धावत्या महाराष्ट्र-कोल्हापूर एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उडी मारल्याची घडली आहे. 23 वर्षीय मोहित सोनी असं जखमी तरुणाचे नाव आहे.

या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने डावा पाय आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. नागपूरच्या कामठी स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

रेल्वे पोलिसांनी जखमी तरुणाला उपचाराकरिता शासकीय रुग्णालय कामठी येथे दाखल केले. त्यानंतर या तरुणाला पुढील उपचारासाठी नागपूरला मेयो रुग्णालयात भरती केले आहे.

नेमकं काय घडलं?

23 वर्षीय तरुण हा आई-वडिलांसोबत रीवा मध्य प्रदेशवरून नागपूरला येत होता. या दरम्यान भंडारा येथे बऱ्याच वेळेपासून पॅसेंजर उभी असल्यानं महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चढले. यावेळी ते रिझर्व्हेशन कोचमध्ये चढले.या प्रवासादरम्यान या तरुणाचा टीसीसोबत वाद झाला. यावेळी टीसीने विना तिकीट असल्यानं दंड भरावा लागेल अथवा तुरुंगात जावं लागेल असं म्हटल्याने वाद झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलगा शिक्षण घेत असल्यानं तुरुंगात भीतीने त्या तरुणांने कामठी स्टेशन जवळ येताच उडी मारली. यात त्याचा पायाला दुखापत झाली. इतवारी रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती इतवारी रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

SCROLL FOR NEXT