US Army Plane: अमेरिकेच्या नौदलाच्या विमानाचा भयंकर अपघात, प्रवाशांसह समुद्रात कोसळलं अन्...

US Army Plane: अमेरिकेतील नौदलाचं एक विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या विमानात काही प्रवासी देखील होते.
US Army Plane
US Army PlaneSaam tv

US Army Plane:

अमेरिकेतील नौदलाचं एक विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या विमानाचा अपघात सोमवारी दुपारी घडला. या विमानात काही प्रवासी देखील होते. विमान समुद्रात कोसळल्याने एकच खळबळ उडाली. विमान कोसळल्यानंतर तातडीने नौदलाच्या कमांडोंनी विमानातील प्रवाशांना किनाऱ्यावर आणून त्यांचा जीव वाचवला आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

नौदलाचं विमान धावपट्टीवर उतरणार होते. मात्र, एका चुकीने विमान थेट धावपट्टीच्या पलीकडे असलेल्या समुद्रात पडलं. यावेळी विमानात काही प्रवासी होते. या अपघातात प्रवासी जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी हा भीषण अपघात झाला. अमेरिकेच्या नौदलाचं P-8A विमान होते.

विमानाचा अपघात झाला, त्यावेळी मुसळधार पाऊस सुरु होता. अमेरिकेतील कानोहे खाडीत विमान कोसळल्याचे दिसत आहे. या विमानाच्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विमान स्पष्टपणे दिसत आहे.

US Army Plane
Patanjali News: ...अन्यथा तुम्हाला १ कोटींचा दंड ठोठावणार', सुप्रीम कोर्टाचा पतंजलीला 'सर्वोच्च' दणका!

विमानाचा अपघात झाल्यानंतर बचाव पथकांच्या सदस्यांनी सर्व ९ जणांना किनाऱ्यावर आणून त्यांचे प्राण वाचले आहे.

नौदलाच्या या विमानाचा वापर गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. या विमानाची निर्मिती बोइंगने केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमेरिकेतील नौदलाच्या विमानाची किंमत काय?

पी-8 विमानाचे अनेक व्हेरिएन्ट्स आहेत. पी-8 विमानाची किंमत जवळपास १५० डॉलर्स असल्याचे सांगण्यात येत आहे.

US Army Plane
Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी ३ हजार अर्ज, २०० जणांची निवड; ६ महिन्यांचे ट्रेनिंग होणार

नौदलाच्या विमान अपघातावर तोफखाना सार्जंट ऑर्लॅंडो पेरेझ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तोफखाना सार्जंट ऑर्लॅंडो पेरेझ म्हणाले, अमेरिकेच्या नौदलाचं पोसेडॉन टोही विमान आहे. या विमानाचा वापर गुप्त माहिती गोळा करण्यासाठी करण्यात येतो'. तर होनोलुलु अग्निशमन विभागाने विमानात आग लागली नसल्याने मोठी दुर्घटना घडली नसल्याचे सांगितले.

US Army Plane
National Herald : राहुल- सोनिया गांधी यांना EDचा दणका; नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियाची ७५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com