Nashik News  Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : दोन मैत्रिणींचा जाच असह्य झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Vishal Gangurde

तबरेज शेख, साम टीव्ही

नाशिक : नाशिकमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये तरुणींच्या जाचाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या केली आहे. नाशिकच्या सिडकोच्या कामटवाडे परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सिडकोच्या कामटवाडे परिसरात एका २३ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. दोन तरुणींच्या जाचाला कंटाळून तरुणाने जीवन संपवलं. ललित बाळासाहेब कोयटे असे या युवकाचे नाव आहे.

ललितने आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी देखील लिहिली आहे. या चिठ्ठीत दोन मैत्रिणी आणि एका मित्राचे पैसे मागण्याच्या जाताला कंटाळून आत्महत्या केल्याचे उल्लेख करण्यात आलं आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललितने चिठ्ठीत केलेल्या आरोपानुसार, पोलिसांनी दोन मैत्रिणी आणि एक मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. तसेच वेळोवेळी पैशांची मागणी केल्याने मित्र आणि मैत्रिणींचा जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.

बेपत्ता असलेल्या १६ वर्षीय शाळकरी मुलाने संपवलं जीवन

१६ वर्षीय शाळकरी मुलगा संभाजीनगरमधून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या वडिलाने करमाड पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. करण भाऊसाहेब पोफळे असं मुलाचे नाव आहे.

मुलाला एक पोलीस आणि शाळेतील शिक्षकाने शाळेत त्याला मारहाण केली होती. याचा अपमान सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप करत मुलाच्या वडिलांनी केला. त्यानंतर मुलाच्या वडील आणि नातेवाईकांनी जालना महामार्गावर रात्री उशिरा जवळपास एक तास रास्ता रोको केला. तसेच मयत मुलाचा मृतदेहाची ॲम्ब्युलन्स पोलीस ठाण्याच्या गेटजवळ उभी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Bhuyar News : दादांचा आमदार बरळला; भरसभेत ठरवली मुलींच्या सौंदर्याची कॅटेगरी, पाहा व्हिडिओ

Pune Helicopter Crash : तटकरेंना घेण्यासाठी जाताना दुर्घटना; हेलिकॉप्टर अपघातात 2 कॅप्टनसह एका इंजिनिअरचा मृत्यू, VIDEO

VIDEO: घोषणांचा पाऊस, अनुदानाचा दुष्काळ! कांदा उत्पादकांचे 24 कोटी कधी देणार?

Amit Deshmukh: सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, अमित देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Israel Iran War : इराण की इस्रायल कोण पडणार युद्धात भारी? कोणाची किती ताकद? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT