दिवसाढवळ्या एकटाच घरफोडी करणारा 22 वर्षीय अट्टल गुन्हेगार जेरबंद!
दिवसाढवळ्या एकटाच घरफोडी करणारा 22 वर्षीय अट्टल गुन्हेगार जेरबंद! -- राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

दिवसाढवळ्या एकटाच घरफोडी करणारा 22 वर्षीय अट्टल गुन्हेगार जेरबंद!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : घरफोडीचे गुन्हे हे शक्यतो रात्रीच्या काळोखात घडल्याचे आपण नेहमी ऐकत असतो.  मात्र, रायगड स्थानिक गुन्हे पथकाने अलिबागमध्ये 8 ऑक्टोबर रोजी दिवसा ढवळ्या तीन फ्लॅटमध्ये झालेल्या घरफोडीतील अट्टल चोर अब्रार अकबर शेख याला 14 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. अब्रार हा फक्त 22 वर्षीय असून आतापर्यत त्याने एकट्याने अलिबाग, मुंबई, ठाणे परिसरात 23 घरफोड्या केल्या आहेत. अब्रार याने ह्या सर्व घरफोड्या दिवसाच्या उजेडात केल्या आहेत. अब्रार याला मुंबई आणि इतर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्यामुळे त्याने रायगडाकडे आपला मोर्चा वळवला होता.

मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्याचे मनसुभे धुळीस मिळविले असून सध्या तो जेलची हवा खात आहे. अब्रार याच्याकडून 3 लाख 30 हजार रोख रक्कम आणि 2 लाख 42 हजार 150 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने असा 5 लाख 72 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अलिबाग शहरातील मुख्य बाजारपेठेतील रहदारी असलेल्या दोन सोसायटीमधील तीन फ्लॅट भरदिवसा अज्ञात चोरट्याने फोडले. ओझोन सोसायटीतील रुपेश जैन यांच्या घराचा दरवाजा हत्याराने उघडून बेडरूम मधल्या कपाटाच्या ड्रॉवरमधील रोख रक्कम आणि दागिने असा 3 लाख 95 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पळवला होता. त्यामुळे भरदिवसा झालेल्या या घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घरफोडीबाबत रुपेश जैन यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी घरफोडी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथक नेमले. पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयीत आरोपीचा नवी मुंबई, मुबई, ठाणे जिल्ह्यात तपास सुरू केला. पथकातील पोलिस हवालदार अमोल हंबीर यांना गुप्त बातमीदारातर्फे सीसीटीव्हीत दिसणारा संशयित आरोपी अब्रार शेख हा असून तो मुंबई मानखुर्द येथे राहत असल्याचे कळले.

त्यानुसार पथकाने सापळा रचून अब्रार शेख याला अटक केली. अब्रार याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर अलिबाग येथील घरफोडी केल्याचे त्याने कबुल केले. त्याच्याकडून 5 लाख 72 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अब्रार शेख हा अट्टल गुन्हेगार असून दिवसाढवळ्या घरफोडी करण्यात तो पटाईत आहे. आतापर्यंत त्याच्यावर मुंबई, ठाणे हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात 20 गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सपोनि पवनकुमार ठाकूर, उप निरीक्षक भारत श्रीवर्धनकर, पोह बंधू चिमटे, हनुमंत सूर्यवंशी, अमोल हंबीर, प्रशांत दवडे, पोना विशाल आवळे, तुषार घरत ( सायबर सेल), अक्षय पाटील, महिला पोना अभियंती मोकल, महिला पोशी जयश्री पळसकर, पोशी ईश्वर लाबोटे यांनी यशस्वी कारवाई केली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंह लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

Urvashi Rautela: ऋषभ पंतशी लग्न करणार का? चाहत्याचा प्रश्न, दोन शब्दात उत्तर देत उर्वशी रौतेलानं चर्चा केली शांत

SCROLL FOR NEXT