Accident news saam tv
महाराष्ट्र

Accident News: शिरूर ताजबंदचे दाेन युवक भीषण अपघातात ठार

या घटनेची अहमदपूर पोलीसांत नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दीपक क्षीरसागर

अहमदपूर : लातुर (latur) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरूर (shirur) ताजबंद राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ रोडवर थोरलेवाडी पाटी जवळ चार चाकी वाहन व मोटार सायकलची समोरा समोर धडक झाली. या अपघातात मोटार सायकलवरील शिरुर ताजबंद येथील दोन युवक जागीच ठार (two youth passes away in accident near shirur) झाले आहेत. अहमदपूर (ahmedpur) पोलीसांत (police) अपघाताची (accident) नोंद झाली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी : थोरलेवाडी पाटी जवळ अहमदपूरकडून लातुरकडे भरधाव वेगाने जात असलेले चार चाकी वाहन क्रमांक (एम.एच २४ ए डब्लु ५३६९) व शिरुर ताजबदकडून अहमदपूरकडे भरधाव वेगाने येणारी मोटार सायकल क्रमांक (एम.एच २४ बि.एच ८२८०) यांची समोरा समोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात मोटार सायकल वरील शिरूर ताजबंद येथील रामेश्वर राजेंद्र चव्हाण (वय २४) व मेघवर्धन ऊर्फ उत्तम ज्ञानोबा डोंगरे (वय २५) हे दोन युवक जागीच ठार झाले.

या अपघातात मोटार सायकलचा चेंदामेंदा झाला. चार चाकी वाहनाच्या चालकास गंभीर दुखापत झाल्यामुळे घटनास्थळावर उपस्थित असलेल्या व्यक्तींनी त्यास उपचाराठी तात्काळ लातुर (latur) येथे पाठविले. या घटनेची अहमदपूर पोलीसांत नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT