2 officers took charge of commisioner post in ichalkaranji muncipal corporation Saam Digital
महाराष्ट्र

दाेन अधिका-यांनी घेतला आयुक्तपदाचा कार्यभार, 2 खूर्च्या लावत सुरु झाला कारभार; इचलकरंजी महापालिकेत नाटयमय घडामाेडी (पाहा व्हिडिओ)

2 officers took charge of commisioner post in ichalkaranji muncipal corporation: या नाट्यमय घडामाेडीची चर्चा आता महापालिकेच्या बाहेर देखील रंगू लागली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

इचलकरंजी महानगरपालिकेत आज (शुक्रवार) दाेन अधिका-यांनी आयुक्त पदाचा पदभार घेतला. दाेन खूर्च्या टाकून दाेन आयुक्त महापालिकेचा कारभार करीत असल्याने महापालिकेत विषय चर्चेचा झाला. अखेर तासभरानंतर एका अधिका-याने कागदपत्रांच्या तपासणीनंतर आयुक्तांच्या दालनातून बाहेर पडणे पसंत केले. या नाट्यमय घडामाेडीची चर्चा आता महापालिकेच्या बाहेर देखील रंगू लागली आहे.

इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली झाली होती. दिवटे यांनी त्यांच्या बदलीस स्थगिती आणली. दरम्यानच्या काळात आयुक्त म्हणून कारभार पाहण्यासाठी पल्लवी पाटील यांनीही पदभार घेतल्याने गाेंधळ उडाला.

आज आयुक्तांच्या दालनात एकाच वेळीस ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील या दोघांनी एकत्रच प्रवेश केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार आयुक्तांच्या दालनात ओमप्रकाश दिवटे यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर सुद्धा पल्लवी पाटील यांनी पदभार सोडला नाही. त्यामुळे दोन्ही आयुक्तांमध्ये काही काळ वादावादी झाली.

त्यातूनच दाेघांनी दोन खुर्च्या लावून कामकाज सुरु केले. तासाभरा नंतर वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधून पल्लवी पाटील यांनी आयुक्तांचे दालन साेडण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार त्यांनी पुन्हा कागदपत्रांची पाहणी करुन पदभार साेडला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

SCROLL FOR NEXT