Wardha News चेतन व्यास
महाराष्ट्र

Wardha: दु:खद! गणपती विसर्जन करायला गेले, परत आलेच नाही; अनंत चतुर्थदशीच्या दिवशीच मांडवा गावावर शोककळा

मृतक बालके हे त्यांच्या कुटुंबासह मांडवा परिसरात असलेल्या मोती नाल्यावर गणपती विसर्जना करिता गेले होते.

Jagdish Patil

चेतन व्यास -

वर्धा: लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आज सकाळपासूनच शहरातील (Wardha) विविध विसर्जन स्थळांवर चांगलीच गर्दी उसळली होती. अशातच मांडवा गावातील असलेल्या मोती नाल्यावर गणपती विसर्जनासाठी (Ganpati Visarjan) गेलेल्या तिघांचा नाल्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेत दोन बालकांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या तिसरा व्यक्तीही बुडाला आहे. तिघांचेही मृतदेह नाल्याबाहेर काढलेत. या घटनेने मांडवा गावावर शोककळा पसरली. कार्तिक बलवीर वय 14, अथर्व वंजारी वय 12, संदीप चव्हाण वय 35 सर्व राहणार मांडवा, अशी मृतांची नावे आहेत.

पाहा व्हिडीओ -

मृतक बालके हे त्यांच्या कुटुंबासह मांडवा परिसरात असलेल्या मोती नाल्यावर गणपती विसर्जना करिता गेले होते. गणपती विसर्जनादरम्यान नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने कार्तिक बलवीर आणि अथर्व वंजारी हे दोघेही पाण्यात बुडाले आणि पाण्यातील चिखलात जाऊन फसले. ही बाब संदीप चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी बालकांना वाचवण्यासाठी नाल्यातील पाण्यात उडी मारली.

मात्र, संदीप देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. संदीप चव्हाण यांच्यासोबत आलेली युवती अंजली चव्हाण हिने मांडवा गावात जात ही बाब संपूर्ण गावात आरडाओरड करीत सांगितली. गावकऱ्यांनी नाल्यावरील पुलावर धाव घेतली. नाल्यातील पाण्यात उडी मारून बालकांचा शोध घेतला. मात्र तिघांचेही मृतदेह हाती लागले.

तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आलेत. या घटनेने मात्र मांडवा गावावर शोक काळा पसरली असून दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सावंगी पोलीस स्टेशनच्या (Savangi Police Station) हद्दीत येणाऱ्या चार ठिकाणी विसर्जनास परवानगी देण्यात आली होती. मांडवा येथील नाल्यावर विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र तरी देखील नागरिकांनी गणपती विसर्जनाला गर्दी केली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT