Car And Truck Accident Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur Accident: भरधाव जीपचा टायर फुटून ट्रकला धडकली; भीषण अपघातात दोन सख्खे भाऊ, सख्ख्या जावांचा मृत्यू

Car And Truck Accident: चंद्रपूर शहरालगत पडोली-घुग्घूस मार्गावरुन ही घटना घडली आहे.

Priya More

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये जीप आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये (Chandrapur Car And Truck Accident) चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहराजवळील पडोली-घुग्घूस मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये जीपचा चक्काचूर झाला आहे. तर ट्रकचे देखील नुकसान झाले आहे. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. चंद्रपूर पोलीस (Chandrapur Police) या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरालगत पडोली-घुग्घूस मार्गावरुन प्रवास करत असताना अहमद लॉनजवळ (चिंचाळा) भरधाव जीपचा अचानक टायर फुटला. त्यामुळे चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीपने विरुद्ध मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये जीपचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावमध्ये राहणारे दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या पत्नी जीपमधून प्रवास करत होते. याचवेळी अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रफिक नबी वस्ताद शेख, संजिदा रफिक शेख, युसुफ नबी वस्ताद शेख आणि मुमताज युसूफ शेख अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे.

दरम्यान, सोलापूरमध्ये चार वाहनांच्या विचित्र अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जण जखमी झाले आहेत. सोलापूर- पुणे महामार्गावर (Solapur Pune Highway Accident News) बाळे येथे आज दुपारच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला. या मार्गावर रस्त्यातच एक डंपर थांबल्यामुळे त्यापाठोपाठ येणाऱ्या चार वाहनांचा अपघात झाला. या डंपरमागील कार, दुचाकीसह चार वाहन एकमेकांना धडकली. अपघातामध्ये या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT