Cholera outbreak in amravati saam tv
महाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यात कॉलराचा उद्रेक, १८१ रुग्ण आढळले, पाच जणांचा मृत्यू

अमरावतीच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणीक

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) थैमान घातलं असून अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी पुराचे पाणी सोसायटी परिसरात शिरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अमरावती आणि चिखलदरा येथे ७ जुलै २०२२ पासून कॉलराची साथ (cholera outbreak) सुरु झाली आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी, कोयलारी आणि घाना या तीन गावांमध्ये तर अमरावती तालुक्यातील नया अकोला या गावांमध्ये सध्या कॉलराचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. आतापर्यंत कॉलराचे १८१ रुग्ण आढळले असून (five people death) पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे पालघर (Palghar) जिल्ह्यातही राज्यातील झिका व्हायरसचा (Zika virus) दुसरा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात कॉलराचे पाच रुग्ण दगावले आहेत. मृतांमध्ये दोन स्त्रिया आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. यातील तीन रुग्ण हे २४ ते ४० वर्ष वयोगटातील तर दोघे ७० वर्षांवरील आहेत. कॉलराबाधित गावात वैद्यकीय पथके २४ तास कार्यरतअसून पाणी गुणवत्ता सनियंत्रण,रुग्ण सर्वेक्षण,उपचारासाठी आवश्यक व्यवस्था,लोक शिक्षण याद्वारे उद्रेक नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्रेकाची पाहणी आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी राज्यस्तरीय पथक अमरावती येथे पोहोचले असून अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य) यांनी या उद्रेकाचा सविस्तर आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांना उद्रेक नियंत्रणाबाबत आवश्यक निर्देश दिले आहेत.

पालघरमध्ये आढळला 'झिका'चा रुग्ण

पालघर येथील तलासरीच्या झाई येथील आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका आजाराची लागण झाली आहे, अशी माहिती एन आय व्ही पुणे यांच्या अहवालाद्वारे समोर आली आहे. यापूर्वी जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यात राज्यातील पहिला झिका रुग्ण आढळला होता. या अनुषंगाने पालघर येथे सर्वेक्षण, कीटक व्यवस्थापन उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT