Amaravti Saam
महाराष्ट्र

Amravati: “माझं स्वप्न डॉक्टर होण्याचं होतं” वडिलांची परिस्थिती बिकट अन्.. दहावीत ९६ टक्के मिळवणाऱ्या तरूणीची आत्महत्या

Student Ends Life Over Financial Burden: “माझं स्वप्न डॉक्टर होण्याचं होतं, पण ते अपूर्णच राहील...” अशा आशयाची नोंद आपल्या डायरीत लिहून बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Bhagyashree Kamble

डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरूणीनं शिक्षणाचा खर्च कुटुंबाला झेपणार नाही म्हणून आत्महत्या केली आहे. “माझं स्वप्न डॉक्टर होण्याचं होतं, पण ते अपूर्णच राहील...” अशा आशयाची नोंद आपल्या डायरीत लिहून तिनं राहत्या घरात आयुष्य संपवलं आहे. ही ह्रदयद्रावक घटना अमरावतीच्या दर्यापुरात घडली असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सायली नवलकार (वय १७ वर्ष) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. अकरावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत बारावीच्या प्रवेशासाठी तिची तयारी सुरू होती. तिला नीटची परिक्षा देऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिक्षणाचा खर्च कसा पेलायचा, या चिंतेने ती खचली होती.

सतत तिला या गोष्टीची चिंता सतावत होती. याच कारणामुळे तिने टोकचं पाऊल उचलण्याचं ठरवलं. घटनेच्या वेळी सायली घरात एकटी होती. छताच्या पंख्याला ओढणी लावून तिने आत्महत्या केली. याची माहिती तिच्या कुटुंबाला मिळताच त्यांनी घरात हंबरडा फोडला. तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णलयात पाठवले. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात तिच्या घरात पोलिसांना एक डायरी सापडली. पोलिसांना मिळालेल्या डायरीत तिने वडिलांची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चामुळे आत्महत्या करत असल्याचं तिनं डायरीत स्पष्टपणे लिहिलं आहे.

सायली ही अतिशय हुशार आणि मेहनती विद्यार्थिनी होती. दहावीच्या परीक्षेत तिने ९६ टक्के गुण मिळवले होते. तिच्या आत्महत्येनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT