10th-12th Exam Saam Tv
महाराष्ट्र

10th-12th Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी, हॉल तिकीटबाबत महत्त्वाची अपडेट समोर

10th-12th Supplementary Exam Hall Ticket Download: दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे.

Siddhi Hande

दहावी-बारावीची (10th-12th Supplementary Exam) पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या दहावी-बारावीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्यांना सीट नंबर वैगेरे सर्वकाही कळणार आहे. जून किंवा पुढच्या महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठीचे हॉल तिकीट आधीच जाहीर करण्यात आले आहेत.

ही प्रवेशपत्र ऑनलाइन (10th-12th Hall Ticket) पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध होतील. हे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करुन तुमच्याजवळ ठेवू शकतात. यावर तुमची सर्व माहिती, सीट नंबर आणि परीक्षेच्या पेपरबाबत सर्व माहिती लिहलेली असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे.

सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी ही प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत,अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.त्यामुळे तुम्हाला तुमच्या कॉलेज किंवा शाळेतून हॉल तिकीटची हार्ड कॉपीदेखील मिळणार आहे.

परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रात दुरुस्त्या असल्यास अथवा विषय/माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात, अशा सूचनाही राज्य मंडळानी दिल्या आहेत.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी बसले आहेत. या विद्यार्थ्यांना पुढच्या महिन्यात पुन्हा परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर त्यांना पुढच्या वर्गात अॅडमिशन मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हॉल तिकीट डाउनलोड करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT