Wardha News Saam Digital
महाराष्ट्र

Wardha News: धक्कादायक! नोकरीच्या लोभात घरीच मारला १०.५० लाखांवर डल्ला; दोघा मित्रांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Wardha News Update: स्वत:च्या घरी मित्राच्या मदतीने चोरी करून मुलाने चक्क दागिने आणि रोख रकमेसह १० लाख ३४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे.

Sandeep Gawade

Wardha News

स्वत:च्या घरी मित्राच्या मदतीने चोरी करून मुलाने चक्क दागिने आणि रोख रकमेसह १० लाख ३४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकत चौकशी केली असता मुलाने नोकरी मिळवून देण्याच्या लालसेतून मित्राच्या मदतीने चोरी केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात पुढे आले. पोलिसांनी चोरीतील सर्व मुद्देमाल रिकव्हर करीत गुन्हा उघड केला.

सिंदी मेघे परिसरातील घरपुरे लेआऊट परिसरातील रहिवासी गोपाल यादव याच्या घरातून त्यांचाच मुलगा यश आणि त्याचा मित्र सारंग घरजाळे याने चार लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम आणि दागिने असा १० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. पोलिसांनी यादव कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. दरम्यान मुलगा यशने दिलेल्या माहितीवर संशय निर्माण झाल्याने त्याला ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवला असता सारंग घरजाळे याने नोकरी लावून देण्यासाठी पैसे मागितले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यशने सारंगला काही पैसे दिले होते. मात्र, आणखी पैसे त्यास द्यावे लागणार असल्याने यशने सारंगला सोबत घेत स्वत:च्याच घरात चोरी करण्याचा बेत आखून दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी यश यादव आणि त्याचा मित्र सारंग घरजाळे या दोघांना अटक करून संपूर्ण मुद्देमाल रिकव्हर केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या निर्देशात पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख, दिनेश कांबळे, धर्मेद्र अकाली, अजय अनंतवार, गणेश सातपुते यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT