धुळे : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली (Dhule) असून पाण्याचे देखील उभे ठाकले आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक भागात देखील पावसाचे प्रमाण कमी असल्याने (Shindkheda) शिंदखेडा तालुक्यात आतापासूनच पाणी संकट निर्माण झाले आहे. (Live Marathi News)
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान (Rain) कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भीषण टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच तालुक्यात बहुतांश ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात (Water Scarcity) पाणीटंचाईच्या झळा शिंदखेडा तालुक्यात कशाप्रकारे असतील याची प्रचिती येऊ लागली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विहिरींनी गाठला तळ
शिंदखेडा तालुक्यात आतापर्यंत २५ गावात विहिरी अधिग्रहण करून तेथून पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक गावातील विहिरींना आताच तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याअभावी रब्बीचे पिकापाठोपाठ फळ पीकही हाताचे जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.