Solapur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Crime: १० वर्षांच्या मुलाच्या अपहरण करून हत्या, कालव्यात आढळला मृतदेह; सोलापूर हादरले

Solapur Police: सोलापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचे अपरहण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. शाळेच्या मैदानावर खेळत असताना त्याचे अपरहण करण्यात आले होते. ४ दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला.

Priya More

सोलापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आली. सोलापुरच्या माढा तालुक्यातील अरण गावात ही धक्कादायक घटना घडली. ४ दिवसांपूर्वी या मुलाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर दगडाने ठेचून या मुलाची हत्या करत मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला. या घटनेमुळे सोलापुरमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माढ्याच्या अरण गावातून अपहरण झालेल्या १० वर्षांच्या शाळकरी मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. कार्तिक बळीराम खंडागळे असं हत्या झालेल्या मुलाचे नाव होते. १५ जुलै रोजी कार्तिक खंडागळे याचे शाळेच्या मैदानावरून अपहण करण्यात आले होते. ४ दिवसांनंतर कार्तिकचा मृतदेह कालव्यात आढळून आला. त्याच्या हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. टेंभुर्णी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कार्तिक शाळेच्या मैदानावर खेळत असताना १५ जुलैला त्याचे अपरहण करण्यात आले होते. एका अज्ञात व्यक्तीने कार्तिकला पळवून नेले होते. या प्रकरणी कार्तिकच्या आई-वडिलांना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. पोलिस कार्तिकला शोधत होते. कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. कार्तिकच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्तिकची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. रक्ताने माखलेल्या अवस्थेत कार्तिकचा मृतदेह दिसून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सध्या पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणी काय खावं हे सरकारनं सांगू नये; मांसबंदीवर राज ठाकरेंचा हल्लाबोल|VIDEO

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! चेक क्लिअरन्सच्या नियमांत केला बदल

General Knowledge: व्यक्तीच्या शिंकण्याचा वेग किती असतो?

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आमदार, महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांचा रिक्षाने एकत्रित प्रवास

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

SCROLL FOR NEXT