परभणीत 25 लाखांच्या गुटख्यासह 10 जणांना अटक राजेश काटकर
महाराष्ट्र

परभणीत 25 लाखांच्या गुटख्यासह 10 जणांना अटक

पाथरी पोलिसांनी अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम उघडली आहे. अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या कारवाईत अटक केली आहे.

राजेश काटकर

परभणी: अवैध पद्धतीने वाहतूक करून प्रतिबंधीत असलेला गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनांवर वेगवेगळ्या तीन ठिकाणी कारवाई करीत पाथरी पोलिसांनी लाखो रुपयांच्या गुटख्यासह 25 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाथरी पोलिसांनी अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम उघडली आहे. अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या कारवाईत अटक केली आहे.

माजलगाव ते मानवत रोडवर गुटखा विक्रेते सर्जेराव प्रल्हाद शिंदे, शिवाजी दत्तराव शिंदे, अशोक चक्राते यांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. दुसरी कारवाई पाथरी - माजलगाव रोडवर ढालेगाव येथील नुरोद्दीन कलीमोद्दीन अन्सारी, अब्दुल मुजाहीद अब्दुल वाहेद अन्सारी, रईस अन्सारी यांना अटक करून केली आहे.

तिसऱ्या कारवाईत ज्ञानेश्वर श्रीराम साहकुडकर, आकाश किशोरप्रसाद तिवारी, अशोक सक्राते, बाबा नखाते यांना पाथरी तालुक्यातील हदगाव येथे कारवाईत ताब्यात घेतले आहे. या तिन्ही कारवाईत पाथरी पोलिसांनी गोवा, राजनिवास, जाफराणी जर्दा आदी 4 लाख 92 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

एकूणच या कारवाईत पोलिसांनी गुटख्यासह तीन चारचाकी, मोबाईल, इतर साहित्य असा 25 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर, मुख्यमंत्र्यांसमोरच फोडला बळीराजानं टाहो

SIRवरून निवडणूक आयुक्त भिडले, निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT