सांगलीच्या कवठेपिरान नजीक सापडली 12 फुटी मगर

कृष्णा आणि वारणाकाठी आता मगरींची धास्ती निर्माण झाली आहे. वारणा नदीकाठी असणाऱ्या कवठेपिरान नजीक असणाऱ्या एका शेतात ही अजस्त्र मगर सापडली आहे.
सांगलीच्या कवठेपिरान नजीक सापडली 12 फुटी मगर
सांगलीच्या कवठेपिरान नजीक सापडली 12 फुटी मगरविजय पाटील
Published On

सांगली: कृष्णा आणि वारणाकाठी आता मगरींची धास्ती निर्माण झाली आहे. वारणा नदीकाठी (Varana River) असणाऱ्या कवठेपिरान नजीक असणाऱ्या एका शेतात ही अजस्त्र मगर (Crocodile) सापडली आहे. तब्बल बारा फुटी हे भली मोठी मगर आहे. ग्रामस्थ आणि वनविभागाच्या (Sangali Forest Deparment) वतीने या मगरीला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर वन विभागाने या मगरीला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेला महापुरा ओसरला आहे. मात्र या ठिकाणी आता एक नवं संकट नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झाला आहे. ते म्हणजे मगरींचे.

सांगलीच्या कवठेपिरान नजीक सापडली 12 फुटी मगर
ZIKA VIRUS UPDATE | झिका व्हायरस वाढल्याने खळबळ, पाहा हा व्हिडिओ

गेल्या काही दिवसांपासून कृष्णाकाठी अनेक ठिकाणी मगरींचा मुक्त वावर पाहायला मिळालं होता. तर नुकताच सांगलीवाडी नजीक एक 12 फुटी महाकाय अशी मगर पकडण्यात आली होती. आणि अशीच एक महाकाय मगर वारणा नदीकाठी असणार्‍या कवठेपिरान नजीकच्या कारंदवाडी रस्त्यावर पकडण्यात आली आहे.

एका शेतात ही मगर आढळून आली. त्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वन विभाग आणि ग्रामस्थांनी मिळून ही भलीमोठी तब्बल 12 फुटी मगर अथक प्रयत्नांनंतर जेरबंद केली. रात्री उशिरापर्यंत मगर पकडण्याचा काम सुरू होतं. त्यानंतर अजस्त्र अश्या मगरीला ताब्यात घेत वन विभागाच्यावतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. मात्र मगरींचा मुक्त वावर कृष्णा आणि वारणा नदीकाठी आता होत असल्याने नागरिकांच्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com