काय सांगता? झोपडपट्टीत राहणाऱ्याला १ लाख २१ हजार पाणीबिल! SaamTvNews
महाराष्ट्र

काय सांगता? झोपडपट्टीत राहणाऱ्याला १ लाख २१ हजार पाणीबिल!

नागपूर महापालिकेच्या पाणीबिलाने अनेकांना शॅाक; अनेक जणांना लाखाच्या वर पाणी बिल

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Muncipal Corporation) पाणीबिलाने अनेक नागपूरकरांना शॅाक दिलाय. झोपडपट्टी भागात राहणाऱ्यांना लाखाच्या वर पाणीबिल आल्याने अनेक जण धक्क्यामध्ये आहेत. आधीच मनपाच्या नळाला पुरेसं पाणी येत नसल्याने लोक त्रस्त आहेत. त्यात आता लाखाच्या वर बिलं आल्याने लोकांना धक्का बसलाय.

हे देखील पाहा :

नितीन आवले नागपूरातील शेंडे नगर, मानवता नगर परिसरातील झोपडपट्टी भागात राहतात. महिन्याला १० हजार रुपये कमावणाऱ्या नितीन आवले यांना तब्बल १ लाख २१ हजार रुपये पाणीबिल (Water Bill) आलंय. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण परिवाराला धक्का बसलाय. हातावर पोट असल्याने आम्ही लेकरांचं पोट भरायचं की लाखाच्या वर आलेलं पाणीबिल भरायचं? हा सर्वात मोठा प्रश्न आवले परिवारासमोर आ वासून उभा आहे.

फक्त आवले परिवारंच नाही तर, टेका नाका परिसरातील ५० ते ६० गरिब परिवाराला लाखाच्या वर पाणीबिल आल्याचं इथले माजी नगरसेवक सांगतात. हे बील गेल्या दहा बारा वर्षातील असल्याचं सांगितलं जातं. मात्र, या नागरिकांना नियमित बील देण्यात आलं नाही. जर नियमित बील दिलं असतं तर नागरिकांना ते भरणे शक्य झालं असतं. मात्र, तसं न करता एका दमात बिलं पाठवल्याने ते भरायचं कसं असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; 'त्या' समाजाचे जोरदार आंदोलन, नेमके प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यातील विषारी दारू प्रकरणी 9 दारु विक्रेत्यांवर CID ने केली मोक्का अंतर्गत कारवाई

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ३-४ किलोमीटरच्या रांगा

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

SCROLL FOR NEXT