Wardha News, bogus seeds saam tv
महाराष्ट्र

Wardha News : वर्धेत बोगस बियाणे रिपॅकिंग करणा-या टाेळीचा पर्दाफाश, 1 कोटी 51 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त (पाहा व्हिडिओ)

एक ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News : चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथे बोगस कापूस बियाणे रिपॅकिंग करुन त्याच्या विक्रीच्या तयारीत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत म्हसाळा येथे एका घरावर पाेलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 1 कोटी 51 लाख 82 हजाराचा मोद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाेलिस या प्रकाराची कसून चाैकशी करीत आहेत.  (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार एका घरात गुजरात येथून आलेल्या बियाण्याच्या पोत्यातून छोट्या पाकिटात रिपॅकिंग केले जात हाेते. विविध नावांचे पाकीट तयार करून त्याची विक्रीसाठी प्रयत्न केले जात हाेते.

पोलीस, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या संबंधित घरावर छापा टाकला. त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. कपाशीच्या बनावटी बियाणे विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर 296 पोते बियाणे जप्त करण्यात आले आहे. त्यासमवेत एक ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सहा संशयित ताब्यात

मध्यरात्रीपासून पथक घटनास्थळावरच आहे. यामध्ये सुमारे 1 कोटी 51 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी (wardha) सेवाग्राम पोलिसांनी सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Vastu Tips: किचनमध्ये कचऱ्याचा डबा ठेवताय? पण नेमका कुठे ठेवावा? वास्तुशास्त्रात सांगितलेत योग्य नियम

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Earthquake : बुलढाणा- जळगावला भूकंपाचे हादरे, गाढ झोपेत असताना पहाटे जमीन हादरली, नागरिकांची घराबाहेर धाव

Rava Ladoo Recipe: रोज संध्याकाळी खाण्यासाठी बनवून ठेवा स्वादिष्ट खमंग रव्याचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

El Nino : अल-निनोमुळे भारतासाठी धोक्याची घंटा! २०२७ मध्ये उष्णतेचा रेकॉर्ड मोडणार, WHO कडून ग्रेड-3 अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT