Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Elections

Assembly Election 2024 : काँग्रेस-ठाकरेंकडून स्वबळाची तयारी? वडेट्टीवार यांनी एका शब्दात विषय संपवला!

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेला असून दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरु केल्याच्या बातम्या माध्यमात धडकल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली. अनेकांनी दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली. समीकरणे जुळवण्यास सुरुवात झाली. पण या सर्व बातम्यांचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एका झटक्यात विषय संपवला. आमच्यातील वाद, मतभेद आणि स्वबळाच्या बातम्या सर्व अफवा आहेत. हा भाजपचा डाव असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले ?

काँग्रेस स्वबळावर लढणार, ही फक्त अफवा आहे. अशी कोणताही चर्चा झालेली नाही. भांडणं लावण्याचा प्रयत्न होत आहे. प्रसारमाध्यमांत येत असलेल्या या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. शिवसेना उद्धव ठाकरे महाविकाास आघाडीत आहेत. आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत, उद्या सगळं चित्र स्पष्ट होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

संजय राऊत यांच्याकडूनही बातम्यांचे खंडण

ही सरळ सरळ पतंगबाजी आहे. दुसऱ्या भाषेत मोठी सुपारी असेही म्हणता येईल.
संजय राऊत, शिवसेना(UBT)

हा फेविकॉलचा जोड

अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. आता आलेल्या बातमीत 1 टक्के देखील तथ्य नाही. काँग्रेस आणि शिवसेनेत वाद व्हावा यासाठी या बातम्या आहेत. संजय राऊत अमित शाह यांना भेटले याबाबत आमची कुठलीही चर्चा नाही. यशोमती ठाकूर यांचं विधान वैयक्तिक आहे. अनेक जागांचा पेच सुटला आहे. आमची शिवसेनेसोबत सारखी चर्चा सुरू आहे. जनता आणि महाविकास आघाडीत फेविकॉल चा जोड आहे... तुटेगा नाही, असे वडेट्टीवर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada PoliticsPolitics: जरांगेंविरोधात भाजपची मराठा खेळी? जाणून घ्या मराठवाड्यासाठी BJP चा स्पेशल फॉर्म्युला

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कोण आहेत नवीन चेहरे? वाचा

Dombivli News : राज ठाकरेंविषयी अपशब्द वापरले; मनसे कार्यकर्त्यांनी दिला रिक्षा चालकाला चोप,VIDEO

Cyclone Dana: 'दाना' चक्रीवादळ या राज्यांमध्ये धडकणार, 120 किमी वेगाने वाहणार वारे; कुठे आदळणार? वाचा

Beed Politics : पंकजा मुंडेंचा समर्थक जरांगेच्या गोटात; राजेंद्र म्हस्के बीडमधून निवडणूक लढणार? VIDEO

SCROLL FOR NEXT