Udhav Thackarey SaamTv
Maharashtra Assembly Elections

Udhav Thackarey News : नकली सेना म्हणणारे बे अकली आहेत, उद्धव ठाकरे सावंतवाडीतून कडाडले

Sindhudurg News : सिंधुदुर्ग येथील सावंतवाडीच्या राजन तेली यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत आज उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर हल्ला चढवला.

Saam Tv

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग सीमेवर भाजपचे लोक अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी काही दिवसांपूर्वी जागा शोधत होते, अदानीचे दलाल बनून हे लोक कोकणात येतात आणि इथल्या लोकांना फसवतात. इथल्या सामान्य जनतेच्या जमिनी ओरबाडून भाजप अदानींच्या चरणी वाहतात, असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग येथील सावंतवाडीच्या प्रचार सभेत ते बुधवारी (दि.13) बोलत होते. यावेळी नकली सेना म्हणणारे बे अकली आहेत, असा टोला देखील त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लगावला आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Udhhav Thackarey) म्हणाले की, जे इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तरीही त्यांनी पक्ष बदलला नाही, बंडखोरी केली नाही या सर्वांची राजकीय जबाबदारी माझी आहे. भाजपाच्या लेखी शिवसेना संपली तरी लोक माझ्याकडे का येतात? जिथे विजय तळमळीने येतात, तिकडे विजय नक्की होतो.

मी घराण्याची परंपरा आणि वारसा घेऊन पुढे जात आहे. मोदी बाळासाहेबांचा, मा साहेबांचा अपमान करतात, मोदींवर कोणते संस्कार आहेत? असा संतप्त प्रश्न यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला.

अशुभ हाताने पुतळा उभारला आणि भ्रष्टाचार केला. हा पुतळा आमचा आत्मा आहे. शिवाजी महाराज म्हणजे तुम्हाला ईव्हीएम मशीन वाटल का? भाजपाजवळ 10 वर्ष सत्ता होती, तरी कोकणचा विकास झाला नाही. इकडे मोदीची गॅरंटी चालत नाही, हे आता दिल्लीपर्यंत पोहोचलं पाहिजे, असा विजय इकडे हवाय, असं आवाहनही यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केलं.

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रासह केसरकर देखील हल्ला चढवत केसरकर पडल्यानंतरच सिंधुदुर्गाचे सर्व काही चांगले होईल, असा खोचक टोला लगावला आहे.

महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला आज एवढ्या वर्षांनंतरही उभा आहे. पण यांनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा एका वर्षात कोसळला. लोकसभेच्या निवडणुकीत धक्का बसल्यानंतर आता यांना माता-भगिनी, शेतकऱ्यांची आठवण आली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवू असं हे आत्ता म्हणत आहेत. मात्र आम्ही या आधीच ते करून दाखवलं आहे. अडीच वर्षात आमचं सरकार पडलं नसतं तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आम्ही दिली असती, असं वक्तव्य देखील आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी केलं.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT