Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : पुण्यात मविआची डोकेदुखी वाढली, ठाकरेंच्या शिलेदाराने पवारांविरोधात दंड थोपाटले, बंडखोरी करणार!

Pune Vidhan Sabha Election News : पुण्यात मविआची डोकेदुखी वाढली आहे. उमदेवारांची घोषणा होताच, इच्छुकांनी बंडखोरीचे हत्यार उपसलेय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा थोड्याफार प्रमाणात कायम आहे. मविआने एक पाऊल पुढे जात उमेदवारांची घोषणा केली. शिवसेना, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपली पहिली उमदेवारी यादी जारी केली. पण त्यानंतर बंडखोरीच्या घटना समोर येऊ लागल्यात पुण्यात मविआला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हडपसर मतदारसंघात मविआच्या अडचणी वाढल्या आहेत. हडपसरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने ठाकरेंच्या शिलेदाराने बंडाची पवित्रा घेतली आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पुण्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. हडपसर मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्याने शिवसेना पदाधिकारी नाराज आहेत. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आज मेळावा घेत अपक्ष लढणार असल्याचे जाहीर करणार आहे. महादेव बाबर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. महादेव बाबर यांचा आज कोंडव्यात निर्धार मेळावा आहे.

हडपसरमध्ये पाच जणांमध्ये लढत -

महादेव बाबर यांच्या अपक्ष उमेदवारीने हडपसरमध्ये होणार पाच जणांमध्ये लढत होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार चेतन तुपे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेकडून येथे शहराध्यक्ष साईनाथ बाबर मैदानात उतरले आहेत. त्यात आता महादेव बाबर यांनी अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. महाविकास आघाडीत जागा राष्ट्रवादीला गेली. तर महायुतीत शिवसेनेला सुटणारी जागा ही अजित पवार गटात गेल्याने शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे ही अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी सुरु केली. दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेनेमध्येच लढत होणार आहे.

वडगाव शेरीमध्ये रंगतदार लढत -

वडगाव शेरी मतदार संघामध्ये राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होतात बापू पठारे शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत.28 तारखेला शक्ती प्रदर्शन करत बापू पठारे अर्ज दाखल करणार आहेत. वडगाव शेरीची जागा महायुतीत कुणाकडे जाणार याकडे लक्ष लागलेय. बापू पठारे यांच्या विरोधात कोण? अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

SCROLL FOR NEXT