Maharashtra Assembly Elections 2024 Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : रवी राणांना पेपर सोपा जाणार? बडनेरामध्ये शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी, प्रिती बंड अपक्ष उमेदवारी दाखल करणार!

Maharashtra Assembly Elections 2024 : प्रिती बंड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरम्याचा निर्णय घेतला आहे. २८ तारखेला त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024: अमरावतीलला बडनेरा विधानसभा मतदारसंघ राज्यातला सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवणारे अपक्ष आमदार रवी राणा यांना यंदाची निवडणूक सोपी नाही, असे म्हटले जात होते. पण रवी राणा यांना दिलासा मिळणार आहे, कारण बडनेरामध्ये शिवसेना गटात बंडखोरीचे चित्र पाहायला मिळत आहे. २०१९ मध्ये रवी राणा यांना तगडी फाईट देणाऱ्या प्रिती बंड यांनी बंड पुकारलेय. शिवसेना ठाकरे गटाने रवि राणांविरोधात सुनील खराटे यांना मैदानात उतरवलेय. त्यामुळे प्रिती बंड यांनी बंड पुकारलेय. (Badnera Assembly constituency)

बडनेऱ्यात ठाकरे गटात बंडाळी -

बडनेरा मतदार संघातून प्रीती बंड यांना उमेदवारी नाकारून ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे प्रीती बंड नाराज असून शनिवारी प्रीती बंड यांच्या निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली व या बैठकीत अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रीती बंड यांनी 2019 च्या निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्या विरोधात 75000 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होत्या. प्रीती बंड यांना उमेदवारी नाकारल्याने एक गट नाराज झाला असून 28 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितल्याने शिवसेनेत बंडखोरी होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. प्रीती बंड या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व माजी आमदार स्वर्गीय संजय बंड यांच्या पत्नी आहेत.

2019 मधील मतांचं गणित?

रवी राणा, आमदार, युवा स्वाभिमान पक्ष. 90हजार 460 मतं.

प्रीती बंड, ठाकरे गट- 74 हजार 919 मतं

15541 मतांनी प्रीती बंड यांचा पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almonds And Walnuts: दिवाळीच्या दिवसात बदाम आणि अक्रोड खाण्याचे ९ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: पुण्यात राहुल गांधी करणार रोड शो

Diwali Skincare : दिवाळीत सुंदर दिसणे पडू शकते महागात; मेकअपमुळे होणाऱ्या स्किन प्रॉब्लेमपासून वाचण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Beed Assembly Election: इकडे विधानसभेची रणधुमाळी, तिकडे बीडमध्ये भाजपला गळती, महायुतीचं टेन्शन वाढलं!

NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच

SCROLL FOR NEXT