Uddhav Thackeray In Parbhani 
Maharashtra Assembly Elections

Uddhav Thackeray: तुम्ही मला संपवू शकत नाहीत; परभणीत उद्धव ठाकरे मोदी, शहांवर कडाडले

Uddhav Thackeray In Parbhani: मणिपूर पेटत असताना पंतप्रधान तिकडे गेले नाहीत. ते पंतप्रधान तुमच्यासाठी काय येतील असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदी प्रचार सभा घेत त्यावरून टीका करताना उद्धव ठाकरे असे म्हणाले.

Bharat Jadhav

सगळी सत्ताभाजपच्या हातात आहे. पण तुम्ही उद्धव ठाकरेंना संपवू शकत नाहीत. माझा पक्ष फोडला, पक्षातील ४० आमदार फोडले,पण माझ्या सोबत लाखो कार्यकर्ते जुडले आहेत. कारण फक्त उद्धव ठाकरे हे नावचं काफी आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी परभणी येथील प्रचासभेत केला. राज्याच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा व्यक्ती स्टार प्रचारक सारख्या सभा घेतो. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि सभा घ्याव्यात असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

काल परवा पासून मोदी, शहा महाराष्ट्रात येत आहेत.निवडणूक जवळ आली की ह्याच्या फेऱ्या सुरु झाल्या.राज्याच्या निवडणुकीसाठी देशाचा पंतप्रधान फडतूस पक्षाच्या प्रचाराला येतात. जर येत असतील नरेंद्र मोदी आणि शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीना दिला पाहिजे आणि आमच्या स्टार प्रचारक सारखं सभा घेत फिरावं, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

संकट असताना पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीसाठी धावणार नाहीत, असं म्हणताना उद्धव ठाकरे म्हणाले जेव्हा मणिपूर पेटत होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे गेले नाहीत. ते पंतप्रधान तुमच्यासाठी काय येणार. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी शिवसेना पक्ष फोडला असल्याची टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली. आताचा भाजप हा संकरित झालाय. दुसऱ्या पक्षातील बीज भाजपच्या गर्भात मुरलीत त्यामुळे त्याची स्थिती अशी झाली. अनेकांना भाजपची आताची विचारसरणी मान्य नाही.

काही उघडपणे आमच्यासोबत येता येत नाही म्हणून भाजपचे काह खासदार फोन सांगतात, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी आमचा पक्ष सर्व मिटून टाकला. आमचा पक्ष फोडला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेपी नड्डा यांनी सांगितलं की, आता आम्हाला आरएसएसचं गरज नसल्याचं म्हटलं होत तर भाजप आणि आमच्यातील गद्दार यांच्यात काह फरक राहिला. मोदी आणि शहा यांनी एकनाथ शिंदे यांना खतपाणी घातलं आणि त्यांना सुरतेला नेलं.आणि आमचा पक्ष चोरला ते आता शिवसेनेवर दावा करतातय.

ज्या आरएसएसनं भाजपला मोठं केलं. त्यांना जन्म दिला त्यानाच संपवण्याचा काम भाजप करत असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. त्यामुळे जे लोक उपकारकर्त्यावर वार करतात ते तुमच्यावर दया कशी करतील. एकीकडे मणिपूर पेटतंय महिलांवर अत्याचार होतोय तिकडे पंतप्रधान जात नाहीत.ते पंतप्रधान आपल्यावर संकट आल्यावर धावून येतील असं वाटतं का? ज्यावेळी तौक्ते वादळ आलं होतं त्यावेळ पंतप्रधान गुजरातला गेले परंतु महाराष्ट्रात आले नव्हते असंदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : निकालाआधी मविआच्या घडामोडींना वेग, मातोश्रीवर तातडीची बैठक, Inside Story साम टीव्हीकडे

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT