Uddhav Thackeray Slams Narendra Modi And Amit Shah Sakal
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: शिंदे गटाचे सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना निवडणूक सोपी राहिली नाही. कारण सत्तारांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट राजकीय शत्रू भाजपला साद घातलीय. सिल्लोडला लागलेला कलंक दूर करूयात असं ठाकरेंनी म्हटलंय. ठाकरेंच्या या हाकेला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळणार त्य़ावर आता सत्तारांच्या विजयाचं गणित अवलंबून आहे. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

लोकसभा निवडणुकीत आणि आता विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या सर्वच नेत्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. अगदी मोदी, अमित शाहांच्या भाषणातही ठाकरेंवर सातत्यानं हल्लाबोल होतोय. ठाकरेही प्रत्येक सभेत भाजपला शिंगावर घेतायेत. अशा राजकीय संघर्षात उद्धव ठाकरेंची एक साद सगळ्यांनाच बुचकाळ्यात पाडतेय.

शिवसेनेच्या बंडात शिंदेंना साथ देणाऱ्या सगळ्या उमेदवारांविरोधात उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक झालेत. यासाठी त्यांनी थेट भाजपसोबत युतीचा हात पुढे केलाय. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात शिंदे गटाचे मंत्री आणि उमेदवार अब्दूल सत्तार यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चक्क भाजपला साद घातलीय. सिल्लोडला लागलेला कलंक दूर करूयात असा निर्धार ठाकरेंनी केलाय. तर सत्तारांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सिल्लोडच्या सभेत भाजपचे काही पदाधिकारीही स्टेजवर उपस्थित होते. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केलाय.

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रावसाहेब दानवेंनी तर सत्तारांमुळे सिल्लोड तालुका पाकिस्तान बनला, अशा शब्दात घणाघाती टीका केली होती. या पाश्वभूमिवर ठाकरेंनी भाजपला हाक दिलीय. भाजप आता याला प्रतिसाद देणार की सत्तार आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र यामुळे सत्तारांची डोकेदुखी वाढलीय एवढं नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT