शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत मनसेमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठी तृप्ती सावंत शिवतीर्थ येथे पोहोचल्या आहेत. तृप्ती सावंत यांनी 2019 ची निवडणूक अपक्ष लढली होती. त्यामुळे शिवसेनेला फटका बसला होता त्यामुळे शिवसेनेचे वांद्रे पूर्वचे उमेदवार दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव होऊन झिशान सिद्धिकी आमदार झाले होते.
शिवसेना ठाकरे गटाचा 2019 मध्ये हा पराभव मातोश्रीच्या अंगणातला असल्याने फार जिव्हारी लागला होता. त्यानंतर तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता. त्यावेळी 2015 मधील वांद्रे पूर्वच्या पोटनिवडणूकीकडे साऱ्यांचं लक्ष होतं. कारण शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं होतं. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यावेळी शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती.
2015 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याविरोधात काँग्रेसकडून नारायण राणे रिंगणात उतरले होते. थेट मातोश्रीला चॅलेंज देण्यासाठी नारायण राणे यांनी शड्डू ठोकला होता. आधी एकतर्फी वाटणारी आणि सहानुभूतीच्या लाटेवर असणारी ही निवडणूक, चांगलीच चुरशीची झाली होती.
मातोश्रीच्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं. या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास 20 हजारांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करताना हद्द पार केली होती. हातात कोंबड्या घेऊन राणेंविरोधात घोषणा दिल्या जात होत्या. पुझे तृप्ती सावंत यांनी 2019 ची निवडणूक अपक्ष लढली होती. त्यानंतर आता २०२४ मध्ये त्या मनसेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.