Raver Assembly constituency Saam TV
Maharashtra Assembly Elections

Raver Assembly constituency : रावेर विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत; कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष

Political News : रावेर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?

Ruchika Jadhav

संजय महाजन, साम टीव्ही प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील रावेर हा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र मागच्या पंचवार्षिकमध्ये या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली होती. काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी या ठिकाणी विजयी झाले होते. आता शिरीष चौधरी यांच्या मुलाला धनंजय चौधरीला काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. नवयुवक आणि प्रथमच विधानसभा निवडणूक लढणार आहेत. धनंजय यांना रावेर विधानसभेत यश मिळते का ते बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे माजी खासदार भाजपाचे निष्ठावंत स्व हरिभाऊ जावळे यांच्या मुलाच्या हातात भाजपाने उमेदवारी दिली आहे. अमोल जावळे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी हवी होती. मात्र पक्षाने त्यांना थांबवून विधानसभेसाठी आता उमेदवारी दिली आहे. हरिभाऊंचा मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या स्वर्गवासानंतर मुलाने ही जबाबदारी सांभाळली आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे अनिल चौधरी यांनी यावेळेस प्रहार संघटनेकडून उमेदवारी घेतलेली आहे. या विधानसभेमध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये मोठ्या मतदानाचा टप्पा पार केला होता. आता जनतेचा कल कोणाच्या बाजूने हे बघनं महत्वाचं आहे.

तर वंचित बहुजन आघाडीकडून शमीबा पाटील या मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. तृतीयपंथी यांना उमेदवारी दिली आहे. रावेर या मतदारसंघात सर्वाधिक पाटील समाजाचे वर्चस्व या ठिकाणी आहे. त्यानंतर आदिवासी आणि मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर आहे.

२०१९ ची आकडेवारी

रावेर : मतदार : २,९७,४०८

झालेले मतदान : २,०१,४५० (६७.७%)

विजयी : शिरीष चौधरी (काँग्रेस) मतेः ७७,९४१ (३८.७ टक्के)

पराभूत: हरिभाऊ जावळे (भाजप) मते ६२, ३३२ (३०.९ टक्के)

पराभूत अनिल चौधरी (अपक्ष)

मते : ४४,८४१ ( २२.३ टक्के)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Pujan : 'या' चुकांमुळे धनलक्ष्मी प्रसन्न होत नाही; वाचा आणि पूजा करताना लक्षात ठेवा

Maharashtra News Live Updates : संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून?

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये उबाठाचे दोन गट; मविआच्या उमेदवाराची अडचण, नाराजांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Rinku Singh: 'गॉड्स प्लान',55 लाख ते 13 कोटी; 2265.64 टक्के हाईक अन् रिंकूने खरेदी केलं स्वप्नातलं घर

Govardhan Puja: १ की २ नोव्हेंबर, गोवर्धन पूजा कधी आहे? पाहा पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT