Sharad Pawar News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका नियोजित वेळेत (maharashtra vidhan sabha election 2024 date) न होता, आता दिवळीनंतर होण्याची शक्यता आहेत. त्यावरुन शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी निशाणा साधलाय. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्तव्याचा दाखलाही दिलाय. शरद पवार आज एका कार्यक्रमासाठी नागपूरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली. तसेच त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. (one nation one election)
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्या, या पद्धतीची भूमिका मांडली. जम्मू-काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची निवडणूक जाहीर झाली. झारखंड आणि महाराष्ट्राची मात्रा निवडणूक जाहीर झाली नाही. पंतप्रधानाचा महाराष्ट्राबद्दलचा निर्णय हा एक प्रकारचा विरोधाभास आहे, याबद्दल आणखी काय सांगायचं असा खोचक टोला यावेळी त्यांनी लगावला.
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश एक निवडणूक आसा नारा दिला होता. भारताच्या प्रगतीसाठी एक राष्ट्र, एक निवडणूक हे स्वप्न साकार करण्यासाठी, सर्व राजकीय पक्षांनी पुढे यावे, असे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. शुक्रवारी निवडणूक आयोगाने झारखंड आणि जम्मू काश्मीरमधील निवडणुका जाहीर केल्या. महाराष्ट्रातील निवडणुका दिवळीनंतर होतील, असा हिंट यावेळी त्यांनी दिली. यावरुन राज्यातील राजकारण तापलेय.
महाराष्ट्रातील काही ठिकाणी हिंसक वळण, काय म्हणाले शरद पवार?
बंगलादेशात सत्तापरिवर्तन झालं. तिथे काही गोष्टी घडल्या, त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटत आहे. बांगलादेशमध्ये जे घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रातून येतील असं काही वाटलं नाही. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही.
महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडलं. राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. आज शांततेची गरज आहे. यासाठी राजकारणात समाजकार्याने संयमाचा पुरस्कार करावा. याबद्दलची खबरदारी घ्यावी. शासनाची भूमिका आणि गृह खात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. बांगलादेशमध्ये घडलं त्याचं परिणामाचे काही कारण होतं. अन्य देशात घडलेल्या गोष्टींसाठी आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्धवस्त होईल किंवा संकटात जाईल, असं काही करू नये, असे शरद पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.