शरद पवार  - साम टिव्ही
Maharashtra Assembly Elections

Sharad Pawar : अजित पवारांकडून आरआर आबांवर टीका, शरद पवारांनी समाचार घेतला, म्हणाले....

Sharad Pawar : शरद पवार यांनी अजित पवार याच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. आरआर आबा यांच्यावरील टीकेला त्यांनी उत्तर दिलेय.

Namdeo Kumbhar

दिवंगत आरआर पाटील यांच्यावर अजित पवार यांनी तासगावमध्ये जाहीर सभेत टीका केली होती. केसाने गळा कापायचे धंदे आहेत, असा आरोप सिंचन घोटाळ्यावर बोलताना अजित पवार यांनी केला होता. अजित पवारांच्या याच आरोपाचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

पाडवा मेळाव्यानंतर बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांचं नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही केलेला नाही. हा प्रश्न कुणी काढला, हे आता सांगायची गरज नाही. आर.आर. पाटील यांचा राज्याच्या राजकारणातील स्वच्छ व्यक्ती म्हणून लौकीक होता. उत्तम प्रशासक म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. आशा नेत्याबाबत उलटीसुलटी चर्चा करणं, होणं हे अशोभनीय आहे.

जी व्यक्ती जाऊन 9 वर्ष झाली, त्यांची प्रतिमा चांगली होती. त्यांच्यावर काही बोललं जातं. ठीक आहे. सत्ता हातात आल्यावर आपण काहीही बोलण्यास मुक्त आहोत, असं काही लोकांना वाटतं, त्यामधीलच हा एक भाग असेल, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला.

सिंचन घोटाळ्याची माहिती अजित पवार यांना फडणवीस यांनी दाखवली. त्यात काही चुकीचं नाही, असं फडणवीस म्हणतात. पण त्यांनी घेतलेल्या गुप्ततेचा शपथेचा तो भंग आहे, असेही शरद पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात प्रचार सभा

David Warner : बॉल टॅम्परिंगमुळं करिअर पणाला लागलं, आता जबरदस्त कमबॅक; वॉर्नर थेट कॅप्टन झाला!

Maharashtra Election: आचारसंहितेत निवडणूक आयोगाची 'भरारी', महाराष्ट्रात 280 कोटींचा मुद्देमाल पकडला; फक्त 78 कोटी कॅश!

VIDEO : माझ्या नणंदेला कडक नोट आवडते; नवनीत राणांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका

Maharashtra : कपड्यांपासून ते ज्वेलरीपर्यंत सर्वकाही एकाच ठिकाणी, पुण्यातील बेस्ट शॉपिंग मार्केट

SCROLL FOR NEXT