kolhapur south saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज गायकवाड होणार आमदार? पाहा Exit Poll

कोल्हापूर दक्षिण मतदार संघाकडून कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कोल्हापूर दक्षिणच्या रिंगणामध्ये आमदार ऋतुराज पाटील आणि भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक आमने-सामने आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. यावेळी विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल २३ तारखेला लागणार आहे. या निकालाच्या आधारावर पुढची ५ वर्ष आता कोणत्या पक्षाची सत्ता येणार? कोणचा उमेदवार निवडून येणार आणि कोण पडणार? याचं संपूर्ण चित्र समोर येणार आहे. अशातच सामचा एक्झिट पोल हाती आला आहे. यावेळी असून कोणत्या ठिकाणी कोणता संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.

कोल्हापूर दक्षिण मतदार संघाकडून कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कोल्हापूर दक्षिणच्या रिंगणामध्ये आमदार ऋतुराज पाटील आणि भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक आमने-सामने आहेत. मात्र तरीही खरी लढाई ही धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या वर्चस्वाची पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी कोण संभाव्य उमेदवार आहे ते पाहूयात.

सामच्या एक्झिट पोलनुसार, कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे संभाव्य आमदार काँग्रेसचे ऋतुराज पाटील असणार आहेत. २०१९ च्या निवडणूकीत देखील ऋतुराज पाटील निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील कोल्हापूरच्या जनतेची पसंती ऋतुराज पाटील यांना असणार आहे.

यंदाच्या वेळी या मतदार संघात ७५ टक्के मतदान झालं. एकंदरीत पाहिल्यास ग्रामीण भागात काँग्रेसचं वर्चस्व अधिक दिसून येतं. शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा जोर जास्त आहे. मात्र तरीही यावेळी ऋतुराज पाटील यांचं वर्चस्व अधिक दिसून येतंय.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होणार, ५ राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेची पूजा नेमकी किती वाजता करावी? जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ

Maharashtra News Live Update: सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात जोरदार पाऊस

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

SCROLL FOR NEXT