MAHIM saam tv
Maharashtra Assembly Elections

SAAM Exit Poll: माहिममधून महेश सावंत होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Mahim Vidhansabha Election Exit Poll Result: मुंबईतल्या सर्वात प्रतिष्ठित लढतींपैकी एक लढत आहे ती माहिम विधानसभा मतदारसंघाची. याचं कारण म्हणजे कारण राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

बुधवारी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडली असून २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यावेळी यंदाची ५ वर्ष आता कोणात्या पक्षाची सत्ता येणार? कोण निवडून येणार आणि कोणाचा उमेदवार पडणार? असे बरेच प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. यावेळी सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून कोणत्या ठिकाणी कोणता संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.

मुंबईतल्या सर्वात प्रतिष्ठित लढतींपैकी एक लढत आहे ती माहिम विधानसभा मतदारसंघाची. याचं कारण म्हणजे कारण राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

माहिममध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली आहे. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र माहिममध्ये ठाकरे गटाची मशाल पेटणार असं चित्र एक्झिट पोलच्या आकडेवारीमधून दिसून येतंय.

माहिमच्या या भागात शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत यांचं पारडं जड दिसून येतंय. याशिवाय अमित ठाकरे यांच्यासोबत शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या तिरंगी लढतीत ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

मनसेकडून अमित ठाकरे निवडणूकीसाठी उभे राहिल्याने या ठिकाणची लढत रंगतदार झाली आहे. यावेळी उमेदवारी मागे घेण्यासाठी दवाब आल्यानंतर देखील सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवली. यामुळे शिंदे गट आणि मनसे यामध्ये वाद देखील रंगला होता. मात्र राजकीय जाणकारांच्या मतानुसार दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं होऊन ठाकरे गटाटे सावंत यांना विजयाची संधी मिळू शकते.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water : पाण्याने भरलेले शहाळे कसे ओळखावे? लक्षात ठेवा 'ही' सिंपल ट्रिक

Maharashtra Live News Update: येवला शहरातील वाईन शॉपमध्ये चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद

Face Hair Removal Tips : हनुवटी-ओठांच्या वर केस वाढतात? आतापासून वापरा 'हे' घरगुती फेसपॅक

Cardamom Benefits: रोज दिवसभर २ वेलची खाल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये कोणाला मिळणार? नवीन अपडेट समोर

SCROLL FOR NEXT