Saam Exit Poll : बारामतीमधून अजित पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Baramati Vidhansabha Election Maharashtra Exit Poll : यंदाच्या निवडणूकीमध्ये सर्वांचं लक्ष्य बारामतीकडे लागलं आहे. राज्यातली सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई ठरली ती बारामतीची. कारण अजित पवारांना त्यांच्याच सख्ख्या पुतण्याने म्हणजे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलं होतं.
Baramati Vidhansabha Election Exit Poll Result
baramatisaam tv
Published On

बुधवारी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली असून २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यावेळी यंदाची ५ वर्ष आता कोणात्या पक्षाची सत्ता येणार? कोणता उमेदवार निवडून येणार, कोण पडणार? असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात आहेत. यावेळी सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून कोणत्या ठिकाणी कोणता संभाव्य आमदार असणार ते पाहूयात.

यंदाच्या निवडणूकीमध्ये सर्वांचं लक्ष्य बारामतीकडे लागलं आहे. राज्यातली सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई ठरली ती बारामतीची. कारण अजित पवारांना त्यांच्याच सख्ख्या पुतण्याने म्हणजे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलं होतं. नेमके कोणते पवार यामध्ये बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एक्झिट पोलनुसार, याठिकाणीचे संभाव्य आमदार कोण आहेत ते पाहूयात.

Baramati Vidhansabha Election Exit Poll Result
Maharashtra Exit Poll : खामगावमधून प्रकाश फुंडकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

यावेळी जनतेचा कल महायुतीकडे असून पवार विरूद्ध पवार या लढतीत अजित पवार बाजी मारणार असं दिसून येतंय. बारामतीमध्ये पुन्हा एकदा अजित पवार निवडून येणार असल्याची चिन्ह आहेत. अजित पवार यांना त्यांचाच सख्खा पुतण्या युंगेंद्र पवार यांचं आव्हान आहे.

बारामती मतदारसंघाकडे यावेळी प्रत्येकाचं लक्ष आहे. गेल्या ३५ वर्षांपासून हा मतदारसंघ अजितदादा पवार यांच्याकडे आहे. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी एकसंध पक्ष होता. मात्र आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडली असून अजित पवार यांनी बारामतीतील प्रत्येक भाग पिंजून काढला आणि यावेळी मतदार आपल्या बाजूने उभे राहतील याची खात्री करून घेतली. त्यामुळे सध्या तरी अजित पवार यांचं पारड जड दिसून येतंय.

Baramati Vidhansabha Election Exit Poll Result
Maharashtra Exit Poll: चिखली विधानसभेतून राहुल बोंद्रे होणार आमदार? VIDEO

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com