Murbad Vidhan Sabha Election 2024 Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll: मुरबाडमध्ये किसन कथोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Murbad Vidhansabha Election Exit Poll: सकाळच्या एक्झिट पोलनुसार भाजपचे किसन कथोरे हे संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे. किसन कथोरे हे शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष पवार यांचा पराभव करण्याची शक्यता आहे.

Priya More

मुरबाड मतदारसंघात भाजप उमेदवाराचं पारडं जड दिसत आहे. मुरबाडमध्ये दुहेरी लढत झाली. या ठिकाणी भाजपचे उमेदवार किसन कथोरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष पवार यांच्यामध्ये तगडी लढत झाली. अशामध्ये या दोघांपैकी नक्की आमदार कोण होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सकाळच्या एक्झिट पोलमध्ये मुरबाड विधानसभेच्या संभाव्य आमदाराचे नाव समोर आले आहे.

सकाळच्या एक्झिट पोलनुसार भाजपचे किसन कथोरे हे संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे. किसन कथोरे हे शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष पवार यांचा पराभव करण्याची शक्यता आहे. किसन कथोरेंना मुरबाडकरांनी पसंती दिली आहे. या मतदारसंघामध्ये दोघांमध्ये काटेंकी टक्कर होती. शरद पवार यांनी या मतदारसंघामध्ये सभा देखील घेतली होती. पण तरी देखील मुरबाडच्या जनतेने किसन कथोरे यांना आमदार म्हणून निवडले असल्याची शक्यता आहे.

किसन कथोरे संभाव्य आमदार होण्याची नेमकी काय कारणं आहेत ते जाणून घेणार आहोत. मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून किसन कथोरे तर महाविकास आघाडीकडून सुभाष पवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत सुभाष पवार यांनी किसन कथोरे यांना आव्हान उभे केले.

किसन कथोरे हे या मतदारसंघामध्ये ३ वेळा आमदार झाले. त्यांना आता देखील विश्वास आहे की ते आमदार होतील. किसन कथोरेंना अंतर्गत वादाचा सामना करावा लागला. कारण वामन म्हात्रे आणि कपिल पाटील निवडणूक प्रचारात दिसले नाही. याचा फटका किसन कथोरे यांना बसू शकतो. तरी देखील किसन कथोरे यांनी केलेली काम, जनसंपर्क, प्रचारासाठी केलेली मेहनत हे लक्षात घेता तेच विजयी होतील असे दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT