बारामती : इंदापुरात विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना मोठा राडा झाला. इंदापूरच्या लाखेवाडीत मोठा राडा झाला आहे. या राड्यात लाखेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यानंतर तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन खाडे यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
इंदापुरात तंटामुक्तीचे बबन खाडे यांनाच मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या राड्यानंतर बबन खाडे यांनी इंदापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. बबन खाडे यांनी किरकोळ जखमी झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीत अजित पवार गट आणि शरद पवार गटात वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या गावच्या तंतामुक्ती अध्यक्षाला मारहाण झाल्याची तक्रार इंदापूर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
प्रभाकर खाडे,संतोष प्रभाकर खाडे, शुक्रराक संतोष खाडे,धनराज प्रदीप खाडे यांनी दमदाटी करुन मारहाण केल्याची तक्रार लाखेवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष बबन रामचंद्र खाडे यांनी इंदापूर पोलिसात दाखल केली आहे. या घटनेत तंटामुक्ती अध्यक्ष बबन खाडे किरकोळ जखमी झाले आहेत.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात परिसरात तणाव झाल्याची घटना घडली आहे. काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या शेळके यांच्या प्रचार कार्यालयात काही लोक लिफाफे घेऊन पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या आरोपानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
घटनास्थळी निवडणूक विभागाचे काही अधिकारी आणि त्यांनी काही लोकांना सोबत घेऊन गेले. मात्र, काँग्रेसने आरोप फेटाळला आहे. भाजपने निवडणूक विभागाच्या माध्यमातून कारवाई करायची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.