MNS Raj Thackeray Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Vidhansabha Election 2024 : राज ठाकरेंचे दोन शिलेदार ठरले, एक उद्धव ठाकरे, तर दुसरा भाजपविरोधात, कोण मारणार बाजी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raj Thackeray Vidhansabha Election 2024 : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. प्रत्येक पक्षाकडून चाचपणी करण्यात येत आहे. राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला असून त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. आज राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election 2024) मनसेकडून दोन उमेदवाराची नावं जाहीर करण्यात आल आहेत. राज ठाकरेंचे विश्वासू असणारे बाळा नांदगावकरांचे नाव मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे. बाळा नांदगावरकर (Bala Nandgaonkar) शिवडी विधानसभा मतदारसंघातून (Shivdi) मैदानात उतरणार आहेत. तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे. राज ठाकरेंचा पहिला धक्का उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) बसलाय, तर दुसरा धक्का पंढरपूरमध्ये भाजपला (BJP) बसल्याची चर्चा सुरु आहे. शिवडीमध्ये अजय उद्धव ठाकरेंचे विश्वासू अजय चौधरी हे सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात आता मनसेनं कंबर कसली आहे. बाळा नांदगावकर मैदानात उतरले आहेत. तर पंढरपूरमधील भाजपचे समाधान आवताडेंच्या विरोधात मनसेकडून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला होता. राज ठाकरे यांनी २०० ते २२५ जागा लढवण्याची घोषणा केली होती. त्याची सुरुवात झाली आहे. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी दोन शिलेदारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांना शिवडीतून तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पाहूयात त्यांच्याबद्दल थोडक्यात..

राज ठाकरेंचे कट्टर कार्यकर्ते, विश्वासू नेते -

बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांचा जन्म २१ जून १९५७ रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. शिवसेनेचे उपनेते म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. बाळा नांदगावकर यांना राज ठाकरेंचे विश्वासू आणि कट्टर नेते म्हणून ओळखलं जाते. शिवसेना विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत ते राहिले.

ते शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी मंत्रीपदही भूषवले होते. छगन भुजबळ यांचा पराभ केल्यानंतर नांदगावकर प्रकाशझोतात आळे होते. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार संभाळला आहे. मनसेचे प्रमुख नेते म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आता ते राज ठाकरेंसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.

राज ठाकरेंना पहिल्यापासून साथ -

दिलीप धोत्रे हे गेल्या 33 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हाही दिलीप धोत्रे हे राज ठाकरे समर्थक म्हणून ओळखले जायचे. 1991 पासून भारतीय विद्यार्थी सेना, कॉलेज शाखाप्रमुख, गटप्रमुख, उप तालुकाध्यक्ष , तालुका अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, शहराध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी शिवसेनेमध्ये असताना भूषवली.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर त्यांच्यासोबत दिलीप धोत्रे आले. दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यात मोठे योगदान दिलं आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. शिबिरांपासून लोकोपयुक्त अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत. मनसेचे सध्या ते प्रमुख नेते आहेत. याआधी मनसेचे उपनेते त्याचप्रमाणे शहर अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं आहे. 2009 ला विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र ते कमी मतांनी निवडणूक हरले होते. आता पुन्हा त्यांना विधानसभेचं तिकीट मनसेतर्फे देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT